Ujani dam water level Sakal
सोलापूर

Ujani Dam Water Storage : उजणी मायनसमधून प्लसमध्ये; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

सुहास कांबळे

पिंपळनेर : सोलापूर जिल्ह्याचे वरदान असणाऱ्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये (पुणे जिल्ह्यात) गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उजणी धरणात येणा-या विसर्गात झपाट्याने वाढ होत असून; सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेली उजनी आज(ता.२६) सकाळी नऊच्या दरम्यान मायनस मधून प्लस मध्ये आली आल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज आज सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी उजनी धरण मृत(मायनस) साठ्या मधून जिवंत(प्लस) साठ्यात आले. दौंड येथून येणा-या पाण्याच्या विसर्ग एक लाखांच्या पुढे गेला असून सध्या एक लाख 48 हजार 732 क्यूसेकचा विसर्ग जलाशयात येत आहे. येणारा प्रवाह वाढत असल्याने सायंकाळपर्यत प्लस पाच ते सहा टक्के धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होईल.

आज सकाळी 9:30 वाजता 0.13% उजनी धरणाची पातळी झाली. गेल्या २४ तासात १४टक्कयांनी उजणीच्या पाणी पातळीत वाढ झाली तर ५६ दिवसात ३३टिएमसी पाण्यात वाढ झाली आहे. सात महिन्यापूर्वी २१ जानेवारीला उजनी मृत साठ्यात गेले होते.

गुरुवारी संध्याकाळी बंद गार्डन येथील विसर्ग घटला असला तरी दौंड येथील विसर्ग दीड लाख क्युसेस पर्यंत गेला आहे. सध्या बंड गार्डन येथून ४१ हजार ५७१ क्युसेस विसर्ग सुरू आहे. गेल्या २४तासात उजणीत आठ टिएमसी पाणी साठा जमा झाल्यामुळे आजपासून उजणी उपयुक्त पाणीसाठ्यात येत असल्यामुळे ऊस लागवडीस वेग येणार आहे. सध्या खडकवासला मधून १४हजार क्युसेस, मुळशी-दहाहजार ७००, कासायसाई१६००, वडीवळे-२१७२ चाकसमान- ६हजार३०, कळमोडी-३०००, चिलईवाडी-२०००, वडज-४०००क्युसेस विसर्ग उजणीधरणात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT