Ujni Boat Accident:  sakal
सोलापूर

Ujni Boat Accident: बुडालेल्या सहा जणांचा अद्याप शोध लागला नाही, यंत्रणा वाढवण्याची मागणी

आण्णा काळे, गजेंद्र पोळ

Dam Accidnet News: उजनी धरणात कुगाव (ता. करमाळा) ते काळाशी ता. इंदापूर यादरम्यान बोट उलटून झालेल्या अपघातात बुडालेल्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ चे जवान बोलविण्यात आले आहे.सकाळपासून शोध मोहीम सुरू असुन दुपारी एक वाजेपर्यंत एकाही व्यक्तींचा शोध लागला नाही.

या दुर्घटनेत सहा जण बुडाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. पाण्यात बुडलांचा शोध घेण्यासाठी आणखी यंत्रणा मागवावी अशी मागणी करण्यात येत आहे. ही दुर्घटना मंगळवार ता.21 रोजी सायंकाळी पाच वाजता घडली आहे.

या दुर्घटनेत झरे( ता. करमाळा )येथील एकाच कुटुंबातील पती-पत्नी व दोन मुले यांचा बुडाले आहेत. तर कुगाव येथील दोन जणांचा समावेश आहे. या बोटीत कुगाव व झरे ता करमाळा येथील प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत एक जण बचावले असून तर इतरांचा शोध सुरू आहे.

कळाशी ता.इंदापूर व कुगाव ता.करमाळा या दोन्ही उजनीच्या काठावर राञीपासुन नागरिकांनी गर्दी केली आहे. यावेळी करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाणी केले आहे.

या बचाव कार्यासाठी सोलापूर जिल्हा व पुणे जिल्हा दोन्ही जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा लावण्यात आली आहे या अपघातात जरी येथील एकाच कुटुंबातील चार जन बुडाले आहेत पती-पत्नी मुलगा मुलगी या दुर्घटनेत बुडाले आहेत .

गोकुळ ऊर्फ कृष्णा दत्तात्रय जाधव (30),कोमल गोकुळ जाधव (वय 25)लहान समर्थ गोकुळ जाधव वय (दिड वर्ष),वैभवी गोकुळ जाधव (वय 3) रा.झरे ता.करमाळा जि.सोलापूर कुगाव ता.करमाळा येथील अनुराग अवघडे(वय 35) गौरव डोंगरे (वय 16) हे पाण्यात बुडाले आहेत.

श्री आजिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे यांचा मुलगा गौरव डोंगरे या दुर्घटनेत बुडाला आहे तर धनंजय डोंगरे यांचा पुतण्या पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे या अपघातातून बचावले आहेत.

बुधवारी सकाळी माजी आमदार नारायण पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन बोटीत बसून ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणी जाऊन पाणी केली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT