Umesh Patil sakal
सोलापूर

Umesh Patil : "विधानसभेला राजन पाटील यांचा उमेदवार पाडणे हेच अंतिम ध्येय," कार्यकर्ता मेळाव्यात उमेश पाटलांचा हल्लाबोल

Umesh Patil : मोहोळ विधानसभा मतदारसंघात माजी आमदार राजन पाटील यांच्या उमेदवाराला पराभूत करणे हेच अंतिम ध्येय असल्याचे उमेश पाटील यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात स्पष्ट केले.

राजकुमार शहा

मोहोळ : मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मोहोळ मतदार संघाचा संघर्ष वेगळा आहे, कसल्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्या बाजूला माजी आमदार राजन पाटील असतील त्यांच्या विरोधात आमची भूमिका राहील. मी प्रदेश प्रवक्ते पदाचा राजीनामा दिल्यानंतर विविध पक्षांच्या वरिष्ठांचे मला फोन आले. मात्र मी जी भूमिका घेणार आहे ती सर्व कार्यकर्त्यांना विचारूनच घेणार आहे. मात्र राजन पाटील यांचा उमेदवार पाडणे हे अंतिम ध्येय असल्याचे प्रतिपादन मोहोळ बचाव संघर्ष समितीचे सदस्य उमेश पाटील यांनी केले.

येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचार विनिमय करण्यासाठी व रणनीती ठरविण्यासाठी आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात उमेश पाटील बोलत होते. मोहोळ विधानसभा मतदार संघ कोणाकडे जाणार याची अद्याप संभ्रमावस्था आहे. उद्धव ठाकरे व जयंत पाटील यांच्याशी बोलणे झाले आहे. माझ्यासाठी मतदारसंघ व जनता महत्त्वाची आहे.

आमदार सचिन कल्याणशेट्टी व राजाभाऊ राऊत यांच्या मार्फत माजी आमदार पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक लावून भाजपात येण्याचे अमीश दाखवले. त्यांच्या कडून खोटे बोलून कोट्यावधीचा निधी आणला. विरोधकांना संभ्रमित करण्यात ते पटाईत आहेत. तुतारी त जाण्याचे वातावरण तयार केले जात आहे. तालुक्यातील लढत दुरंगी होणार आहे. या निवडणुकीत केवळ दोनच पक्ष असणार आहेत. राजन पाटील विरुद्ध राजन पाटील विरोधक.

दरम्यान आपली भूमिका काय असावी या संदर्भात गावो गावच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी मतदार संघातील प्रत्येक गावात "परिवर्तन यात्रेचे" आयोजन केले आहे. त्याचे वेळापत्रक ही तयार झाले आहे. सर्व कार्यकर्त्यांशी विचार विनिमय झाल्यानंतर मेळाव्याचे आयोजन करून त्यातच निर्णय घेतला जाईल. यावेळी रमेश बारसकर, संजय देशमुख, पद्माकर देशमुख, संजय क्षीरसागर, राहुल क्षीरसागर, सोमेश क्षीरसागर, यांनी मनोगते व्यक्त केली.

दरम्यान मेळावा सुरू असताना एवढा अपमान होऊनही पुन्हा अजित पवारांकडे कसल्याही परिस्थितीत जायचे नाही या भावनेच्या भरात सचिन चव्हाण या कार्यकर्त्यांने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर कार्यकर्त्यांनी सावधगिरीने प्रसंगावधान राखून तो कटू प्रसंग टाळला.

दरम्यान माझ्याकडे कुठलीही सहकारी संस्था, पतसंस्था नाही तरीही मी संघर्ष करतो आहे. मात्र विरोधकांना माझी दखल घेऊन वरिष्ठांच्या कानावर एवढा एकच माणूस त्रास देतोय हे सांगावे लागले.

कार्यकर्ता संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करताना उमेश पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT