रामलाल चौकातील कार्यालयावर हा हल्ला करण्यात आला आहे. तोडफोड करणारे हे गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे.
सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हा कार्यालयावर (NCP office) दगडफेक करण्यात आली आहे. कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचा दगडांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न अज्ञात दोन इसमांनी केला आहे. रामलाल चौकातील कार्यालयावर हा हल्ला करण्यात आला आहे. तोडफोड करणारे हे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे. (Unidentified persons damaged the Solapur NCP office)
भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी सोलापुरात दगडफेक करण्यात आली होती. गाडीवर हल्ला करणारे दोन आरोपी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा आरोपही करण्यात आला होता. कालच्या घटनेनंतर आज (गुरुवारी) गोपीचंद पडळकर यांनी सोलापूर शासकीय विश्रामगृहात बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, या घटनेमुळे राष्ट्रवादीचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. कारण, मागच्या वर्षभरामध्ये घडलेल्या घडामोडी महाराष्ट्रातील बहुसंख्य बहुजनांवर अन्याय करणाऱ्या आहेत आणि त्याच्याविरोधामध्ये मी जाहीरपणे आवाज उठवत आहे. ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण यांच्या नाकर्तेपणामुळे गेले आहे. अजित पवारांमुळे पदोन्नत्तीमधील मागास्वर्गीयांचं आरक्षण गेलं. त्यामुळे महाराष्ट्रभर छोट्या छोट्या जात घटकांच्या घोंगडी बैठका घेत आहे. आणि घोंगडी बैठकांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे राष्ट्रवादी तळातून हललेली आहे. लोक जागे होताहेत ये राष्ट्रवादीला पटत नाहीये, त्यामुळे राष्ट्रवादी मुद्द्यावरून गुद्द्यावर गेली आहे, असा आरोप केला आहे
कालपासून घडत असलेल्या एकूण घडामोडींमुळे सोलापुरात एकच खळबळजनक वातावरण तयार झाले आहे. आज रामलाल चौक येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयावर अज्ञात दोघांनी दगडफेक करून कार्यालयाचे नुकसान केले. यामुळे शहरात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस असे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.