universal id card for disabled sakal
सोलापूर

Universal ID Card : एका क्लिकवर दिव्यांगांना मिळणार वैश्विक ओळखपत्र

सकाळ वृत्तसेवा

Solapur News - दिव्यांगासाठी वैश्विक ओळखपत्र वितरण प्रणाली विकसित करण्यात आली आहे. दिव्यांग वैश्विक ओळखपत्र प्राप्त करून घेण्यासाठी केवळ एका क्लिकवर मिळवता येणार आहे.

जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांनी ही माहिती दिली. केंद्र शासनाच्या www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली वैयक्तिक पूर्ण भरून ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज भरल्यानंतर दिव्यांग व्यक्तीस त्यांच्या अर्ज भरल्याची पावती प्राप्त होते. या पावतीवर त्यांच्या जिल्ह्यातील रुग्णालयांची यादी दिसेल. अर्जदारास त्यांच्या दिव्यांगत्व प्रकारानुसार जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणी करिता जाता येईल.

हा ऑनलाइन अर्ज संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक/अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यांच्या लॉगिन आयडी वर उपलब्ध झाल्यावर ऑनलाइन अर्जाची पडताळणी (Verification) करतात. पडताळणी केलेला ऑनलाइन अर्ज संबंधित दिव्यांगत्वाचे मूल्यांकन (Assessment) करणाऱ्या तज्ज्ञाकडे पाठविला जातो. संबंधित तज्ज्ञ त्या दिव्यांग लाभार्थ्यांची मूल्यांकन (Assessment) करून केलेले मूल्यांकन ऑनलाइन संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

हा ऑनलाइन अर्ज संबंधित रुग्णालयाच्या दिव्यांग वैद्यकीय मंडळाकडे वर्ग होतो. दिव्यांग वैद्यकीय मंडळाने दिलेले निर्देश ऑनलाइन संकेतस्थळावर अदयावत केल्यानंतर दिव्यांग लाभार्थ्याला वैश्विक ओळखपत्र व दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र ऑनलाइन उपलब्ध होते.

जिल्हा शल्य चिकित्सक/ अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचे कार्यालयाकडून ऑनलाइन जनरेटर केलेल्या वैश्विक ओळखपत्र महाराष्ट्र राज्यासाठी नेमलेल्या प्रिंटिंग एजन्सीकडे ऑनलाइन हस्तांतरित केले जाते. नंतर ही वैश्विक ओळखपत्रे स्पीड पोस्टाद्वारे घरपोच प्राप्त होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT