solapur  sakal
सोलापूर

विद्यापीठाची पुरवणी परीक्षा होणार नाही? गणेशोत्सव, युवा महोत्सवामुळे वेळ अपुरा; नोव्हेंबरमध्ये सत्र परीक्षेचे नियोजन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मागील सत्र परीक्षेच्या निकालास लागलेला विलंब आणि आता गणेशोत्सव व ऑक्टोबरमधील युवा महोत्सव, यामुळे पुरवणी परीक्षा होणार नाही, अशी सद्य:स्थिती आहे. नोव्हेंबरमध्ये सत्र परीक्षा होणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मागील सत्र परीक्षेच्या निकालास लागलेला विलंब आणि आता गणेशोत्सव व ऑक्टोबरमधील युवा महोत्सव, यामुळे पुरवणी परीक्षा होणार नाही, अशी सद्य:स्थिती आहे. आता नोव्हेंबरमध्ये सत्र परीक्षा होणार असून पुरवणी परीक्षा न झाल्यास सत्र परीक्षेवेळी या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची संधी मिळेल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

सत्र परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने पुरवणी परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते. पण, ४५ दिवसात जाहीर होणारा निकाल मुदतीत लागला नाही. आता निकाल जाहीर झाले आहेत, परंतु गणेशोत्सवामुळे परीक्षा घेणे अशक्य मानले जात आहे. दुसरीकडे १० ते १३ ऑक्टोबर या काळात पंढरपूर येथील श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयात (स्वेरी कॉलेज) युवा महोत्सव रंगणार आहे.

सध्या त्याची तयारी सुरु आहे. त्यामुळे पुरवणी परीक्षा घेता येईल का नाही, या संभ्रमात विद्यापीठ प्रशासन आहे. पुरवणी परीक्षा घेणे, त्यासाठी नोंदणी सुरु करून विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविणे, परीक्षा घेऊन त्यांचा निकाल जाहीर करण्यास किमान महिनाभर कालावधी लागणार आहे. त्यामुळे परीक्षा होणार नाही, अशी सध्याची स्थिती आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाने पुरवणी परीक्षेसंदर्भातील प्रस्ताव ॲकॅडमिक कौन्सिलकडे पाठविला असून पुढील आठवड्यात त्यावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

सत्र परीक्षेत ‘त्या’ विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी

दोन सत्रात ९० दिवसांचे अंतर जरुरी आहे. त्यानुसार नोव्हेंबरच्या १५ तारखेपूर्वी विद्यापीठाची पुढील सत्र परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू आहे. मागील सत्र परीक्षेत अनुत्तीर्ण किंवा गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची संधी मिळणार आहे. विद्यापीठाने पुरवणी परीक्षेचे नियोजन केले होते, पण सध्या ते अशक्यप्राय वाटत आहे. त्यामुळे आगामी सत्र परीक्षेतच त्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची संधी मिळणार आहे. त्यासंदर्भातील अधिकृत घोषणा विद्यापीठाकडून काही दिवसात होईल, असेही सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde : अन् विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर एकाच गाडीतून हॉटेलमधून पडले बाहेर, कारण काय?

Latest Marathi News Updates : डहाणूत बहुजन विकास आघाडीला धक्का; बविआच्या उमेदवाराचा भाजप प्रवेश

IND vs AUS : भारताचे आघाडीचे ६ फलंदाज ठरले? एका फोटोने पर्थ कसोटीसाठीची स्ट्रॅटजी केली उघड

FIR lodged on Vinod Tawde: आचारसंहिता भंग प्रकरणी विनोद तावडे, भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल

World Men's Day : असंख्य पुरूषांच्या वाट्याला घुसमट; वेळीच मार्ग न सापडल्यास मानसिक आजारांसह व्यसनाधीनतेची भीती

SCROLL FOR NEXT