Solapur Crime sakal
सोलापूर

Solapur Crime : व्ही. के. मार्ट मॉलची ३१ लाखांची फसवणूक ; बार्शीतील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

शहरातील भवानी पेठ भागात असणाऱ्या व्ही. के. मार्ट मॉलमध्ये रोकड लिपिक म्हणून काम करणाऱ्याने सॉफ्टवेअरमध्ये ग्राहकांच्या मूळ बिलांमध्ये बदल करून ३१ लाख २९ हजार ४४३ रुपयांच्या रकमेची अफरातफर केली. याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

बार्शी : शहरातील भवानी पेठ भागात असणाऱ्या व्ही. के. मार्ट मॉलमध्ये रोकड लिपिक म्हणून काम करणाऱ्याने सॉफ्टवेअरमध्ये ग्राहकांच्या मूळ बिलांमध्ये बदल करून ३१ लाख २९ हजार ४४३ रुपयांच्या रकमेची अफरातफर केली. याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संकेत गौरीशंकर सोनवणे (रा. बार्शी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. युवराज सोपल यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना ४ जून ते १७ डिसेंबर २०२३ यादरम्यान घडली.

शहरामध्ये २०१८ पासून व्ही. के. मार्ट सुरू असून, पाचजणांच्या भागीदारीमध्ये आहे. मॉलच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारासाठी गेज आयटी कंपनीचे सॉफ्टवेअर घेतले आहे. या सॉफ्टवेअरची माहिती असलेल्या व्यक्तीची गरज होती, त्यावेळी मॉलमध्ये येऊन संकेत सोनवणे भेटला. त्याने मॉलमध्ये सप्टेंबर २०१८ पासून रोख लिपिक पदावर कामाला सुरवात केली. त्यास अॅडमिन आयडी पासवर्ड दिले. रोज मॉलचे १० ते १५ लाख रुपये व्यवहाराची रक्कम त्याच्याकडे असे.

जून २०२४ मध्ये मॉलच्या भागीदारांनी सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे ठरवले. त्यानुसार सॉफ्टवेअर कंपनीच्या अभियंत्याला बोलावून माहिती दिली. ऑडिट समरी त्यांच्याकडून पडताळणी केली असता पैशाची अफरातफर झाली असल्याचे निदर्शनास आले.

संकेत सोनवणे कधी-कधी मॉलमध्ये सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी मुक्काम करीत असे. त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्याने रक्कम खिशात ठेवत असल्याचे दिसले. बिलांच्या रकमेत फेरफार करता येते का? असे कंपनीच्या अभियंत्याला विचारले असता करता येते, असे सांगून त्यांनी किती अफरातफर झाली त्याची पूर्ण समरी दिली.

ग्राहकांच्या मूळ बिलांमध्ये बदल करून संकेत सोनवणे याने जादा बिलांची रक्कम कमी दाखवून ३१ लाख २९ हजार ४४३ रुपयांची अफरातफर केली. विश्वास संपादन करून फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक महेश गळगटे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT