milind shambharkar sakal
सोलापूर

सोलापूरमध्ये सोमवारपासून ‘१५ ते १८’चे लसीकरण; जिल्हाधिकारी शंभरकर

जिल्ह्याच्या टास्क फोर्सची आढावा बैठक गुरुवारी सातरस्ता येथील नियोजन भवनात झाली.

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोना लसीकरणासाठी(corona vaccination) नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी सकाळी लवकर ग्रामीण भागात पोहोचावे. सोमवारपासून (ता.३) जिल्ह्यातील १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. या वयोगटातील मुलांची संख्या अंदाजे २ लाख ३० हजार एवढी असून त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांच्याशी संपर्क साधून जास्त जास्त लसीकरणासाठी(vaccination) प्रयत्न करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर(collector milind shambharkar) यांनी केल्या आहेत.

जिल्ह्याच्या टास्क फोर्सची(solapur task force) आढावा बैठक गुरुवारी सातरस्ता येथील नियोजन भवनात झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी या सूचना केल्या आहेत. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या उपअधिष्ठता डॉ. आर. डी. जयकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद शहा, कोविडच्या नोडल अधिकारी डॉ. अग्रजा चिटणीस, डॉ. बसवराज लोहारे, डॉ. अतिश बोराडे, डॉ. अरूण काटकर, सहायक कामगार आयुक्त अशोक कांबळे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त राहूल काटकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्‍यता गृहीत धरून सर्व विभागांनी दक्ष रहावे. जिल्ह्यातील सर्व ऑक्‍सिजन प्लांट व ऑक्‍सिजन प्रोसेस प्लांट सुरू असणे आवश्‍यक आहे. सर्व टॅंकमध्ये ऑक्‍सिजन भरून ठेवणे गरजेचे आहे. सर्व सीसीसी, आयसोलेशन सेंटर पूर्ववत चालू करावे लागले तर त्या अनुषंगाने सर्व तयारी करणे आवश्‍यक आहे. ऑक्‍सिजन बेड व इतर काही आरोग्य विषयक साधन सामुग्री तपासून घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT