MSEDCL  Sakal Media
सोलापूर

वैराग : महावितरणला शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

बार्शी तालुक्‍यात अनेक गावात कृषीपंपाचा वीज पुरवठा महावितरणने बंद केला आहे

सकाळ वृत्तसेवा

वैराग: आधीच शेतकरी विविध संकटाचा सामना करीत असताना महावितरणकडून कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी वैराग येथील वीज वितरण कार्यालयास गुरुवारी निवेदन देत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

बार्शी तालुक्‍यात अनेक गावात कृषीपंपाचा वीज पुरवठा महावितरणने बंद केला आहे. सध्या शेतातील उभ्या पिकाला पाण्याची गरज आहे. द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र असून सध्या द्राक्ष फळ काढणीला आलेले आहे, अशा अवस्थेत पाण्याची अत्यंत आवश्‍यकता आहे. मात्र, वीज नसल्यामुळे वर्षभर काबाडकष्ट करून पिकवलेले पिक शेवटच्या टप्प्यात वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना लिखित स्वरूपात वीज बिल दिले नाही. त्यामुळे त्यांना थकबाकी कळत नव्हती. मात्र, सध्या मार्च महिन्यात कडक थकबाकी वसुली सुरू आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. ज्यावेळेस पिकाला खरी गरज पाण्याचे असते त्याच वेळी वीज पुरवठा बंद करून शेतकऱ्यांना अडवून बिल वसूली करणे चुकीचे आहे. सध्या वरून आदेश आहेत असे सांगून वीज कंपनीकडून शेतकऱ्यांचे कनेक्‍शन कट करण्याचे काम सुरू आहे. पिके जळून जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पूर्व कल्पना न देता वीज कनेक्‍शन कट केल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी वैराग मध्ये वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

यावेळी सोमनाथ क्षीरसागर, राजाभाऊ निंबाळकर, विनोद काशिद, काकासाहेब काशिद, आनंद गुंड, प्रतापराव निंबाळकर, शरद पवार, लक्ष्मीसागर काशिद,विठ्ठल घाटे, सोपान काशिद, दिलीप साबळे, सत्यवान क्षीरसागर, संजय क्षीरसागर, संजय काशिद, शहाजी काशिद, चक्रधर काशिद, विनोद जगझाप यांच्यासह वैराग, दहिटणे, मुंगशी, तडवळे, सासुरे येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Resignation: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार? जाणून घ्या काळजीवाहू मुख्यमंत्री प्रक्रियेबद्दल

Sakal Podcast: कमी वजनाच्या बाळासाठी उभारणार एसएनसीयू कक्ष ते कसोटीतील विजयानंतर भारतीय कर्णधाराकडून विराटची स्तुती

कुमक कमी, तरी पोलिसांचे ‘मिशन इलेक्शन’ यशस्वी! सोलापूर शहराच्या तिन्ही विधानसभेची निवडणूक शांततेत; ८२८ बूथचे ४५ सेक्टर करून पोलिस आयुक्तांकडून बंदोबस्ताचे चोख नियोजन

Mumbai Crime: पोलिसांची मोठी कारवाई, चार बांगलादेशी नागरिकांना अटक

5 वर्षांनंतर सोलापूरला मिळणार स्थानिक पालकमंत्री? सोलापूरच्या भाजप पदाधिकाऱ्यांची प्रदेशकडे मंत्रिपदाची मागणी; दोन्ही देशमुख की कल्याणशेट्टींना संधी, उत्सुकता शिगेला

SCROLL FOR NEXT