तुमच्या वाहनावर दंड आहे का? 1 ऑगस्टपर्यंत भरा, अन्यथा वाहने काळ्या यादीत Canva
सोलापूर

तुमच्या वाहनावर दंड आहे का? 1 ऑगस्टपर्यंत भरा, अन्यथा...

तुमच्या वाहनावर दंड आहे का? 1 ऑगस्टपर्यंत भरा, अन्यथा वाहने काळ्या यादीत

तात्या लांडगे

बेशिस्त वाहनांवर वॉच ठेवून अपघात कमी करण्याच्या हेतूने एप्रिल 2019 पासून राज्यात "वन स्टेट वन ई-चलान' पद्धत सुरू झाली.

सोलापूर : बेशिस्त वाहनांवर वॉच ठेवून अपघात कमी करण्याच्या हेतूने एप्रिल 2019 पासून राज्यात "वन स्टेट वन ई-चलान' (One State One e-Invoice) पद्धत सुरू झाली. वाहनाचा वेग, त्यांचा बेशिस्तपणा कॅमेऱ्यात कैद करून त्या वाहनाला ऑनलाइन दंड आकारला जातो. आता संबंधित वाहनधारकांनी तडजोड रक्‍कम न भरल्यास त्यांना काळ्या यादीत टाकले जाणार आहे. ई-चलानचा ऑनलाइन दंड भरण्यासाठी ऍपल अथवा अँड्रॉईड मोबाईल लागणार आहे. (Vehicles that have not paid the e-challan penalty by August 1 will be blacklisted-ssd73)

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, दारू पिऊन वाहन चालविणे, अतिवेगाने व हयगयीने वाहन चालविणे, अशा विविध कारणांवरून वाहनांना अडवून त्यांना जागेवरच दंड केला जातो. परंतु, अनेकांकडे रोखीने दंड भरायला पैसे नसतात आणि बहुतेकवेळा वाहनचालक व वाहतूक पोलिसांमध्ये (Traffic police) वादाचे प्रसंगही घडतात. या पार्श्‍वभूमीवर वाहतूक पोलिसांनी "वन स्टेट वन ई-चलान' प्रणाली विकसित केली. त्याद्वारे आता बेशिस्त वाहनांना ऑनलाइन दंड आकारला जात आहे. परंतु, ऑनलाइन दंड आकारल्यानंतर अनेकांनी दंड भरण्याकडे पाठ फिरविली आहे. दंडाची रक्‍कम आणि बेशिस्त वाहनांची संख्या मोठी झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण वाहतूक पोलिसांनी नवे परिपत्रक काढले आहे.

ठळक बाबी...

  • मुंबई शहरातील वाहनांचालकांना Mum Traffic यावर पाहता येईल तडजोडीची रक्‍कम

  • मुंबई वगळता अन्य जिल्ह्यांमधील वाहनधारकांना Maha Traffic वर पाहता येईल दंडाची रक्‍कम

  • ऑगस्ट 2019 मध्ये ऍप डाउनलोड करून दंड पाहण्याचे निर्देश देऊनही बेशिस्त वाहनचालकांनी केले दुर्लक्ष

  • अँड्रॉईड मोबाईलमध्ये प्ले स्टोअर तर ऍपल मोबाईलमध्ये आयओएस स्टोअरमधून डाउनलोड करता येईल ऍप

  • My Vehicle यावर क्‍लिक करून वाहनाचा नंबर व चेसिसचे शेवटचे चार अंक भरल्यानंतर समजणार दंडाची रक्‍कम

  • 1 ऑगस्टपर्यंत दंड अथवा तडजोडीची रक्‍कम न भरल्यास संबंधित वाहनाला टाकले जाणार काळ्या यादीत

1 ऑगस्टपर्यंत ई-चलानचा दंड तथा तडजोडीची रक्‍कम न भरलेली वाहने काळ्या यादीत टाकली जाणार आहेत. त्यांना भविष्यात आरटीओ विभागाशी संबंधित कामे करताना व्याजासह तो दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या वाहनांनी मुदतीत तडजोडीची रक्‍कम भरावी.

- धनंजय जाधव, पोलिस निरीक्षक, जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT