जिल्हा दूध संघ निवडणूक esakal
सोलापूर

दूध संघ निवडणूक : माजी मंत्री म्हेत्रे, पाटील, शिंदेंची एंट्री

जिल्हा दूध संघ निवडणूक : दिग्गज नेत्यांना ब्रेक? माजीमंत्री म्हेत्रे, पाटील, शिंदेंची एंट्री

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

डीसीसीच्या अगोदर निवडणुकीचा गुलाल उधळण्यासाठी दूध पंढरी सज्ज झाली आहे.

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (Solapur District Central Co-operative Bank) निवडणुकीचा (Election) धुराळा उडण्यापूर्वीच शांत झाला. डीसीसीच्या अगोदर निवडणुकीचा गुलाल उधळण्यासाठी सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ (दूध पंढरी) (Dudh Pandhari) सज्ज झाला आहे. दूध संघाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. या मतदार यादीत फक्त 263 दूध उत्पादक संस्था मतदानासाठी पात्र ठरल्या आहेत. या 263 संस्थांमधील फक्त 57 संस्थांच्या प्रतिनिधींना दूध संघाच्या संचालकपदाची (सर्वसाधारण असलेल्या 12 जागांवरील) निवडणूक लढविता येणार आहे. त्यामध्ये माजी संचालक आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde), माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane), माजी उपाध्यक्ष मनोहर डोंगरे (Manohar Dongare) यांच्या नावांचा ठराव नाही. त्यामुळे दूध संघाच्या आगामी निवडणुकीत या तीन दिग्गज नेत्यांना ब्रेक बसण्याची शक्‍यता आहे. (Veteran leaders have been given a break in the District Milk Association elections)

माजी आमदार माने यांच्या नावाचा ठराव 263 संस्थांमध्ये आहे. परंतु 57 संस्थांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश नाही. आमदार संजय शिंदे व माजी उपाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्या नावांचा ठराव 263 संस्थांमध्येही नसल्याने ते आगामी निवडणुकीपासून अलिप्त राहण्याची शक्‍यता आहे. दूध संघाच्या संचालकपदाची आगामी निवडणूक लढविण्यासाठी पात्र ठरलेल्या 57 संस्थांमध्ये माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre), जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रांत पाटील (Vikrant Patil), जिल्हा परिषदेचे सदस्य रणजितसिंह शिंदे (Ranjitsinh Shinde) या प्रमुख नावांचाही समावेश आहे. त्यामुळे दूध संघाच्या आगामी निवडणुकीत हे तीन नवे चेहरे दिसण्याची शक्‍यता आहे.

प्रशासक येण्यापूर्वी दूध संघावर कार्यरत असलेल्या संचालक मंडळातील आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak), योगेश सोपल (Yogesh Sopal), राजेंद्रसिंह राजेभोसले, बबनराव आवताडे, मारुती लवटे, विजय यलपल्ले, संभाजी मोरे, औदुंबर वाडदेकर, अलका चौगुले यांचा त्या 57 जणांमध्ये समावेश आहे. त्यामुळे यातील अनेक जण निवडणुकीनंतरही पुन्हा दूध संघात दिसण्याची शक्‍यता आहे. 263 मध्ये पात्र ठरलेल्या व्यक्तींना महिलांच्या दोन, एससी, एसटीची एक, ओबीसीची एक, भटक्‍या जाती / विमुक्त जमाती / विशेष मागास प्रवर्गाची एक अशा 5 जागांवर निवडणूक लढविता येणार आहे. पात्र यादीवर दावे व हरकती स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत काही बदल होतो का?, यादीच्या विरोधात कोणी न्यायालयात धाव घेतो का? यावरही बऱ्याच राजकीय घडामोडी अवलंबून आहेत.

प्रशासकामुळे पारदर्शक यादी

दूध संघाच्या निवडणुकीसाठी ठराव पाठविलेल्या 959 संस्थांपैकी फक्त 263 संस्था मतदानाला पात्र ठरल्या आहेत. 696 संस्था अपात्र ठरल्या आहेत. पात्र ठरलेल्या 263 संस्थांमधील फक्त 57 संस्थांचे प्रतिनिधी संचालकपदाची निवडणूक लढण्यास पात्र ठरले आहेत. दूध संघावर सध्या प्रशासकीय मंडळ कार्यरत आहेत. प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा विशेष लेखापरिक्षक श्रीनिवास पांढरे (Shriniwas Pandhare) व मंडळाचे सदस्य म्हणून सहाय्यक निबंधक आबासाहेब गावडे (Abasaheb Gawde) कार्यरत आहेत. दूध पंढरीची मतदार यादी प्रशासकांमुळे निर्भेळ व पारदर्शक झाल्याने अनेकांचा पत्ता गूल झाल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT