Solapur News sakal
सोलापूर

Solapur News : शाळकरी मुलीच्या मूत्रपिंड उपचारासाठी गावकऱ्यांची मदत

"गावकरील ते राव काय करील" अशी म्हण सध्या समाजात प्रचलित आहे. गावकऱ्यांच्या मनात आले तर एखादी चांगली गोष्ट व्हायला फार वेळ लागत नाही.

राजकुमार शहा

मोहोळ : "गावकरील ते राव काय करील" अशी म्हण सध्या समाजात प्रचलित आहे. गावकऱ्यांच्या मनात आले तर एखादी चांगली गोष्ट व्हायला फार वेळ लागत नाही. मोरवंची ता मोहोळ येथील श्रीदेवी साबळे या विद्यार्थ्यांच्या मूत्रपिंड उपचारासाठी शिरापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून दोन तासात शिरापुरातून 26 हजार रुपयांची रोख मदत संकलित झाली. श्रीदेवीच्या उपचारासाठी तिच्या वडीलाकडे ती रक्कम सुपूर्द केली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मोरवंची येथील गोपाळ साधू साबळे यांची श्रीदेवी ही वर्षाची कन्या आहे. बारावी पर्यंत शिक्षण घेतले. मात्र घरची परिस्थिती हालाखीची असल्याने कोरोना काळापासून शिक्षण अर्ध्यातून सोडून दिले. गेल्या सात आठ महिन्या पासून तिला काही शारीरिक त्रास होऊ लागला. मोहोळ येथील काही खाजगी दवाखान्यात उपचार घेतले. तेवढया पुरता दिलासा मिळावयाचा. दरम्यान काही दिवसात श्रीदेवीच्या हाता पायावर सूज येऊ लागली. पुन्हा मोहोळ येथील एका खाजगी रुग्णालयात विविध तपासण्या केल्यावर तेथील डॉक्टरांनी श्रीदेवीची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याचे निदान केले. त्यानंतर साबळे यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेतले.

मूत्रपिंड निकामी झाल्यावर "डायलेसिस" शिवाय पर्याय नाही. गोपाळ साबळे यांना सल्ला दिल्यानंतर त्यानी मुंबई येथील जे जे रुग्णालय गाठले. त्या ठिकाणी डायलिसिस मोफत होऊ लागले, परंतु डायलिसिस साठी लागणारे साहित्य आणण्यासाठी लागणाऱ्या पैशाची अडचण भासू लागली. दोन दिवसाआड डायलिसिस करावे लागते. एकावेळी डायलेसीस साठी दीड ते दोन हजार रुपयांचे साहित्य लागते. तेवढे करणे ही साबळे यांच्या आवाक्या बाहेरचे आहे. गोपाळ साबळे एका साखर कारखान्यात कामाला होते परंतु, साखर कारखाने बंद झाल्याने त्या ठिकाणी ब्रेक देण्यात आला. त्यामुळे आधार असलेली नोकरी ही बंद झाली.

गोपाळ साबळे यांची स्वतःचे एक मुत्रपिंड मुलीला देण्याची तयारी आहे. परंतु घरात कमावते हे गोपाळ एकटेच असल्याने सर्वच प्रपंच बंद पडेल अशी भीती त्यांना आहे. पत्नीचे मूत्रपिंड द्यावे तर तिच्याही मोठया तीन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ती ही अशक्त आहे. घरात विवाह योग्य दुसरी एक मुलगी आहे. व एक मुलगा आहे. या सर्वांचा भार केवळ गोपाळ यांच्यावरच आहे. डॉक्टर म्हणतात मुलीला खाऊ घाला तिच्या अंगात ताकद आल्यावर मुत्रपिंड रोपनाचा विचार करू.

मुलीच्या उपचारा साठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी अशी अपेक्षा गोपाळ साबळे यांनी व्यक्त केली आहे. मदतीसाठी 8010267829 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन साबळे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT