Ajit Pawar Latest News  esakal
सोलापूर

Ajit Pawar : सोलापूर राष्ट्रवादी नेत्यांचे ‘वेट अँड वॉच’! कोठे, तौफिक शेखसह अन्य नेत्यांसमोर पेच; अजित पवार पुन्हा येण्याची आशा

पक्षाची ताकद वाढविण्यासाठी दुसऱ्या पक्षातून राष्ट्रवादीत गेलेले महेश कोठे, तौफिक शेख, ॲड. यु.एन. बेरिया, सुधीर खरटमल, नलिनी चंदेले यांच्यासमोर आता आपण कोणाकडे व्हावे, असा पेच आहे. सध्या भूमिका स्पष्ट करण्याऐवजी त्यांनी ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शहर राष्ट्रवादीतील नेत्यांनी एकमेकांशी संपर्क करून आता आपण कोणाकडे जायचे, याची विचारपूस केली. दरम्यान, महापालिका निवडणुकीत पक्षाची ताकद वाढविण्यासाठी दुसऱ्या पक्षातून राष्ट्रवादीत गेलेले महेश कोठे, तौफिक शेख, ॲड. यु.एन. बेरिया, सुधीर खरटमल, नलिनी चंदेले यांच्यासमोर आता आपण कोणाकडे व्हावे, असा पेच आहे. सध्या तातडीने भूमिका स्पष्ट करण्याऐवजी त्यांनी सध्या ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.

एक वर्षापूर्वी शिवसेनेत दोन गट पडले, त्याची धग अजून कमी झालेली नाही. तेवढ्यात आता राष्ट्रवादीत देखील उभी फूट पडली. वरिष्ठ स्तरावर राजकीय नेत्यांनी समीकरणे जुळवली, पण स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे काय, याचा विचार झालाच नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना अनेकांनी काँग्रेस, भाजप, शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता त्या नेत्यांची कोंडी झाली आहे. महापालिका निवडणूक आता दिवाळीत होण्याची शक्यता आहे. अशावेळी निर्माण झालेला हा पेच तथा संभ्रम कोणाच्या पथ्यावर पडणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

महेश कोठे म्हणाले, चार दिवसानंतर भूमिका ठरवू

शहरातील कोणते नेते कोणासोबत जाणार हे चित्र पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. तुर्तास महेश कोठेंसह सर्वच नेत्यांनी ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. महेश कोठे म्हणाले, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व ज्येष्ठ नेते अजित पवार दोघेही आम्हाला सारखेच असून दोघांनीही मदत केली आहे. त्यामुळे आम्ही भूमिका स्पष्ट करण्यापूर्वी ४-८ दिवस वाट पाहू. पूर्वीप्रमाणे हा तिढा सुटेल, अशी आशा आहे. नाही मिटले तर कार्यकर्त्यांशी चर्चा करून भूमिका जाहीर करू, असे कोठे यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीचा राज्याचा आश्वासक चेहरा शरद पवार असले तरी, आगामी महापालिकेत शहराचा आश्वासक चेहरा कोण, याचे उत्तर राष्ट्रवादीला द्यावेच लागणार आहे.

तौफिक शेख म्हणाले, आम्हीच संभ्रमात, निर्णय लवकरच

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाला मान्य करीत आम्ही सहा नगरसेवकांनी ‘एमआयएम’मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. पण, अजितदादा आता शिंदे-फडणवीस सरकारसोबत गेले आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्याने आता आम्ही कोठे राहायचे, याचा निर्णय समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून चार-पाच दिवसांत भूमिका स्पष्ट करणार आहोत. आम्ही राष्ट्रवादीतच असणार, पण शरद पवार की अजित पवार, यावर बैठकीनंतर शिक्कामोर्तब होईल, असे माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

कोठे, तौफिक शेखसह अन्य नेत्यांची राष्ट्रवादीला गरज

जुना विडी घरकूलसह शहर उत्तर व शहर मध्य विधानसभा मतदारसंघात महेश कोठेंची ताकद मोठी आहे. जवळपास १५ नगरसेवक ते सहजपणे निवडून आणू शकतात. दुसरीकडे ‘एमआयएम’चे तत्कालीन नेते तौफिक शेख यांनीही पहिल्यांदाच नऊ नगरसेवक निवडून आणले होते. त्यांच्याकडे देखील स्वत:ची ताकद असलेले नेते आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला महाविकास आघाडीसोबत सत्ता मिळवायची असल्यास हे दोन प्रमुख नेते स्वत:कडे ठेवावेच लागतील. पण, त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडूनही सुरु आहे. सुधीर खरटमल व ॲड. बेरिया यांचीही साथ राष्ट्रवादीसाठी महत्त्वाची असणार आहे. आता या नेत्यांच्या भूमिकेवर आगामी महापालिकेच्या सत्तेचे समीकरण अवलंबून असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT