Ujjain Boat Accident  sakal
सोलापूर

Ujjain Boat Accident : उजनी जलाशयातील जलवाहतूक व्हावी सुखकारक ; आवश्‍यक यंत्रणा अन्‌ ठिकाणे व्हावीत निश्चित,नियमावलीही आवश्‍यक

कुगाव-कळाशी बोट दुर्घटनेत सहाजणांचा बळी गेल्यानंतर उजनीतील जलवाहतुकीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. उजनी धरणातून करमाळा व इंदापूर तालुक्यातील दररोज सुमार ३८०० लोक बोटीच्या माध्यमातून जलमार्गाने प्रवास करतात, हे वास्तव आहे.

गजेंद्र पोळ

चिखलठाण : कुगाव-कळाशी बोट दुर्घटनेत सहाजणांचा बळी गेल्यानंतर उजनीतील जलवाहतुकीचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. उजनी धरणातून करमाळा व इंदापूर तालुक्यातील दररोज सुमार ३८०० लोक बोटीच्या माध्यमातून जलमार्गाने प्रवास करतात, हे वास्तव आहे. हा प्रवास जर धोकादायक बनत असेल तर पर्याय निर्माण करण्याची व जलप्रवासासाठी काही नियम व अटी घालून तो अधिकृत व सुखकारक करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

उजनी धरणातून करमाळा व इंदापूर तालुक्यातील १३ गावामधून १६ बोटी प्रवासी वाहतूक करतात. या माध्यमातून ७० ते ८० किलोमीटरचा रस्ता प्रवास वाचतो. यामुळे लोकांच्या वेळ व पैशाची बचत होते म्हणून अनेक लोक काहीसा धोकादायक असला तरी या पर्यायाचा स्वीकार करतात. उजनी धरणातून पूर्वीपासून या जलमार्गाने प्रवास सुरू आहे. पूर्वी लाकडाच्या साध्या होड्यांमधून हा प्रवास होत होता. या जागी आता यांत्रिक बोटी आल्या आहेत. या प्रवासी बोटीच्या माध्यमातून लोक अनेक दिवसापासून प्रवास करत आहेत.

या प्रवासामुळे करमाळा तालुक्यातील लोक इंदापूर, बारामती, पुणे या ठिकाणी आपल्या कामानिमित्त जातात. महाराष्ट्रातील अनेक नद्या, तलाव, धरणातून व समुद्रामार्गे ही प्रवासी वाहतूक केली जाते. शासनाकडून अधिकृत परवानगी घेऊन येथे नियमित जलमार्गाने प्रवाशांची वाहतूक केली जाते. सध्या या वाहतुकीवर शासनाचे कोणतेही नियंत्रण करणारी यंत्रणा नाही. या प्रवासी वाहतुकीला अधिकृतपणा आणण्याची यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे. उजनी धरणातून जलवाहतुकीसाठी शासनाकडून ठिकाणे निश्चित करण्याची गरज आहे. तसेच वाहतूक नियमावली तयार करून त्याची पूर्तता करणाऱ्यांना अधिकृत परवाने देणे व त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा निर्माण केल्यास उजनीतून जलवाहतूक सुखकारक होऊ शकेल, असे या क्षेत्रातील अभ्यासकांना वाटते.

ठळक बाबी...

  • सध्याची उजनीतून होणारी जलवाहतूक धोकादायक आहे, या कारणावरून ती बंद करण्याचा प्रयत्न शासनाकडून झाला तरी अवैधरीत्या छुप्या पद्धतीने ही वाहतूक सुरूच राहण्याची शक्यता आहे.

  • ही वाहतूक बंद करण्याची शासनाची इच्छा असल्यास शासनाला येथे नवीन पूल तयार करून पर्यायी व्यवस्था निर्माण करून द्यावी लागेल.

  • या मार्गाने प्रवास करणाऱ्या लोकांची मोठी संख्या. करमाळा तालुक्यातील तालुक्यात शिक्षण, आरोग्य, व्यवसाय क्षेत्रात सुविधांची कमतरता असल्याने या तालुक्यातील अनेक लोक त्या सुविधा मिळवण्यासाठी इंदापूर, बारामती, पुणे येथे या मार्गाने जातात

  • या प्रवासामुळे अधिक खर्चात बचत होत असल्याने मुख्यतः कमी उत्पन्न गटातील लोक मोठ्या प्रमाणावर या प्रवासाचा वापर करत आहेत

  • करमाळा तालुक्यातील काही रस्त्यांची अवस्था फारच बिकट असल्याने धरण काठावरील गावातील लोकांना आपल्या कामासाठी करमाळा, जेऊर या ठिकाणी या खराब रस्त्याने जाण्यापेक्षा जलमार्गाने इंदापूरला जाणे सोयीचे वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT