पंढरपूर : कष्टकरी शेतकरी आणि सर्वसामान्य गोरगरिबांचा देव अशी ओळख असलेल्या पंढरीच्या सावळ्या विठुरायाची श्रीमंती वाढू लागली आहे. कोरोनानंतर विठुरायाच्या खजिन्यात तब्बल ६१ कोटींचे दान जमा झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पटीने मंदिर समितीचे उत्पन्न वाढले आहे. तर अवघ्या दोन वर्षांत सात किलो सोन्याचे व ६५ किलो चांदीच्या दागिन्यांची खजिन्यात भर पडली आहे.
दक्षिण भारताची काशी समजल्या जाणाऱ्या पंढरीच्या विठुरायाची महती सातासमुद्रापार गेली आहे. देशासह परदेशातूनही भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. वाढत्या भाविकांच्या संख्येमुळे मंदिर समितीला मिळणाऱ्या देणगीच्या रकमेत ही भरीव वाढ झाली आहे.
अलिकडेच नांदेड येथील एका भाविकाने पावणेदोन किलो वजनाचे सोन्याचे दागिने विठुरायाला गुप्तदान म्हणून अर्पण केले आहेत. मंदिर व्यवस्थापनाच्या प्रयत्नामुळे देणगीदारांची संख्या वाढू लागली आहे. कोरोना काळात मंदिर भाविकांना दर्शनासाठी वर्षभर बंद होते. तरीही देखील भाविकांनी ऑनलाइनच्या माध्यमातून विठुरायाला १२ कोटींचे दान दिले होते.
मंदिरे पुन्हा सुरू झाल्यानंतर भाविकांची मोठी गर्दी वाढली आहे. सध्या दररोज किमान ५० हजारांहून अधिक भाविक पंढरीत येऊन विठुरायाचे दर्शन घेतात. नुकत्याच झालेल्या माघी यात्रेसाठी विक्रमी चार लाख भाविकांनी गर्दी केली होती. यात्रा काळात मंदिर समितीला चार कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. दिवसेंदिवस मंदिराच्या उत्पन्नात भरघोस अशी वाढू होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे.
गेल्या वर्षीच्या (२०२१-२०२२) आर्थिक वर्षात विठुरायाच्या खजिन्यात २० कोटींचे दान जमा झाले होते. यंदा ३१ जानेवारीअखेरपर्यंत तब्बल ४१ कोटी ४४ लाख ५८ हजार रुपयांचे भरभरून दान जमा झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षातील ३१ जानेवारी अखेरपर्यंत दुप्पटीने उत्पन्नात वाढ झाली आहे.
यामध्ये दोन वर्षांत तब्बल सात किलो वजनाचे सोन्याचे तर ६५ किलो चांदीच्या दागिन्यांची भर पडली आहे. वाढत्या सोने-चांदीच्या व रोख देणग्यांमुळे देवाचा खजिना अधिक समृद्ध होऊ लागला आहे. मंदिर प्रशासनाने नुकतेच अंदाजपत्रक सादर केले आहे. त्यामध्ये उत्पन्नवाढीचे अनेक पर्याय सुचविण्यात आले असून पुढील वर्षी ६० कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
कोरोनानंतर मंदिर समितीच्या उत्पन्नात भरीव वाढ झाली आहे. गतवर्षी मंदिर समितीला २० कोटी ४७ लाखांचे उत्पन्न मिळाले होते. चालू आर्थिक वर्षातील ३१ जानेवारी अखेरपर्यंत ४१ कोटी ४४ लाख ५८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये दोन वर्षांमध्ये सात किलो सोने व ६५ किलो चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. पुढील वर्षी ६० कोटी उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
- बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक, श्री विठ्ठल मंदिर समिती, पंढरपूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.