Wedding Esakal
सोलापूर

लग्न सोहळ्यांना परवानगी, मात्र साहित्याची दुकाने बंदच !

लग्न सोहळ्यांना परवानगी आहे मात्र लागणाऱ्या साहित्याची दुकाने बंद आहेत

कुलभूषण विभूते

नवरदेव- नवरीचे कपडे, सोन्या-चांदीचे दागिने, बूट, चप्पल, गरजेची भांडी यासह इतर साहित्य आणायचे कोठून, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे.

वैराग (सोलापूर) : कडक निर्बंधांच्या कालावधीत 25 जणांच्या उपस्थितीत लग्न कार्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र लग्नासाठी लागणाऱ्या आवश्‍यक साहित्याची दुकाने बंद आहेत. त्यामुळे विवाह सोहळ्यात (Wedding ceremonies) अडचणी निर्माण होत असून, या साहित्याविना लग्न करावे तरी कसे, असा सवाल वर-वधू पित्यासह नागरिकांकडून उपस्थित होत आहे. (Wedding ceremonies are allowed but essential shops are closed due to lockdown)

कोरोनाच्या (Covid-19) पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदीसह (Curfew) काही निर्बंध लावण्यात आले आहेत. हे निर्बंध लावताना जिल्हा प्रशासनाने विसंगत निर्णय घेतले आहेत. त्याचा सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. लॉकडाउन (Lockdown) काळात अल्प उपस्थितीत लग्नकार्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे लग्न सोहळ्यासाठी आवश्‍यक असणारे कपडे, सोने, बूट, चप्पल, भांडी, यांची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे नवरदेव- नवरीचे कपडे, सोन्या-चांदीचे आवश्‍यक दागिने, बूट, चप्पल, गरजेची भांडी यासह इतर साहित्य आणायचे कोठून, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे. या आवश्‍यक साहित्याशिवाय लग्न पार पडू शकत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे लग्न सोहळा आहे, ते नागरिक त्रस्त झाले असून लॉकडाउनच्या या नियमांबद्दल संताप व्यक्त करीत आहेत. निदान लग्नकार्यासाठी तरी ते साहित्य विकण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. तसे करता येत नसेल तर लग्नकार्यासाठी परवानगी कशाला देता? अशीही संतप्त भावना अनेकांकडून व्यक्त होत आहे.

मुख्याधिकाऱ्यांच्या नावाचा दुरुपयोग

एका व्यावसायिकाला पकडण्यात आल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या एका कर्मचाऱ्याने चक्क पोलिसांना फोन लावला. तहसीलदार, प्रांताधिकारी, मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी आणि वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांना काहीही माहिती नसताना, काही वरिष्ठांच्या नावाचा दुरुपयोग करताना दिसते. तर अनेकजण कर्मचाऱ्याने, पोलिसांनी पकडलेल्या व्यावसायिकाला कारवाईविनाच सोडून देण्यास सांगतात. कडक निर्बंधात काही अधिकारी चक्क दुकाने उघडून फळे खरेदी करतात. तर काही कर्मचारी स्वतःच्या फायद्यासाठी दुकाने उघडत असल्याचे अनेक प्रकार संचारबंदी काळात घडताहेत. याला जबाबदार कोण, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

आमच्या मुलीचा विवाह निश्‍चित झाला आहे. मात्र लॉकडाउनमुळे लग्न सोहळ्याच्या साहित्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सर्वत्र दुकाने बंद आहेत. त्यामुळे आम्ही आता अगोदर लग्न नंतर खरेदी साहित्य करण्याचा विचार करत आहोत.

- कमलाकर क्षीरसागर, वधुपिता, मुंगशी (वा), ता. बार्शी

कडक लॉकडाउन असल्याने लग्न सोहळ्यासाठी लागणाऱ्या साहित्याची सर्व दुकाने बंद आहेत. याचा परिणाम दुकानदार, व्यापारी यांच्या उलाढालीवर तर झालाच आहे, खरेदी कुठे करायची, असा प्रश्‍न वधू-वरपित्यांना पडला आहे. सर्व दुकाने खुली असतील तरच खरेदी करणे सोयीचे आहे.

- प्रकाश कासार, भांडी व संसारोपयोगी साहित्याचे व्यापारी, वैराग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT