कोण आहे शरद पवारांच्या डोक्‍यातील विधानपरिषद निवडणुकीसाठीचा उमेदवार? Canva
सोलापूर

कोण आहे पवारांच्या डोक्‍यातील विधानपरिषद निवडणुकीसाठीचा उमेदवार?

कोण आहे शरद पवारांच्या डोक्‍यातील विधानपरिषद निवडणुकीसाठीचा उमेदवार?

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी बाजी मारणार, की पुन्हा भाजप येणार? या निकालाचा थेट परिणाम हा जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांवर होतो.

सोलापूर : सोलापुरात कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) ताब्यात असलेली स्थानिक सत्तास्थाने मागील काळात भाजपने (BJP) आपल्याकडे खेचून आणली आहेत. एकेक करत सर्व सत्तास्थाने ताब्यात घेण्याची सुरवात सोलापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधानपरिषद निवडणुकीपासून झाली होती. गेलेली सत्तास्थाने पुन्हा मिळविण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला आता पुन्हा विधानपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून संधी मिळणार आहे. जिल्हा परिषद आणि महापालिकेपूर्वी विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी बाजी मारणार, की पुन्हा भाजप येणार? या निकालाचा थेट परिणाम हा जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांवर होतो. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून शरद पवारांच्या (Sharad Pawar) डोक्‍यात कोण आहेत? याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे.

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्यात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीची चर्चा झाली. आघाडी कशी आणि कोणासोबत करायची, यावरही बंद खोलीत आणि कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांनी उघडपणे भाष्य केले. या संपूर्ण दौऱ्यात सोलापूरच्या विधानपरिषद निवडणुकीत ना बंद दाराआड चर्चा झाली ना कार्यकर्ता मेळाव्यात हा विषय निघाला. महापालिका आणि झेडपीसाठी तयारीला लागा, असा मेसेज देऊन पक्षाध्यक्ष पवार बारामतीला गेले. इच्छुक आणि कार्यकर्त्यांमध्ये मात्र विधानपरिषदेच्या निवडणुकीचे गुपित कायम राहिले आहे. विधानपरिषदेसाठी पवारांच्या मनात कोण? या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी आता तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

2015 मध्ये झालेल्या सोलापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजप व शिवसेनेकडे संख्याबळ नसतानाही भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांनी विक्रमी विजय मिळवला होता. दीपक साळुंखे यांच्या पराभवात इतर कारणांसोबतच राज्यातील त्या वेळेच्या भाजप सत्तेचा महिमा हे एक प्रमुख कारण होते. विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी व महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही; परंतु राज्यात सत्ता आहे. भाजपकडे राज्यातील सत्ता नाही, परंतु मोठे संख्याबळ आहे. त्यामुळे महाविकासच्या सत्तेचा महिमा या निवडणुकीत चालणार का? राष्ट्रवादीतील सर्व गटांसह शिवसेना आणि कॉंग्रेसला मान्य असलेला कोणता उमेदवार शरद पवार विधानपरिषदेच्या आखाड्यात उतरविणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कॉंग्रेस, शिवसेनेची साथ हवीच

विधानपरिषद निवडणुकीच्या अगोदरच राष्ट्रवादीने महाविकास आघाडीचा धर्म मोडत महापालिका आणि जिल्हा परिषद डोळ्यासमोर ठेवत सोलापुरातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेतले आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला कॉंग्रेस आणि शिवसेनेची मदत घ्यावीच लागणार आहे. याशिवाय भाजपच्या गोटातील नाराज मंडळी शोधावी लागणार आहे.

विधानपरिषदेला सांगड दूध संघाची?

2015 मध्ये झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकी दरम्यानच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक सुरू होती. विधानपरिषदेसाठी मदत हवी असेल तर डीसीसीवर घ्या, असे तडजोडीचे राजकारण त्या काळात झाले होते. सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सध्या ठराव गोळा केले जात आहेत. कदाचित यंदाच्या विधानपरिषद निवडणुकीतील मदतीच्या तडजोडीला दूध पंढरीतील संचालक पदाची बोली लावली जाण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT