माढ्याचे आमदार बबन शिंदे हे अजित पवार (Ajit Pawar) गटासोबत गेल्याने शरद पवार (Sharad Pawar) पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
पंढरपूर : माढा विधानसभा मतदारसंघ (Madha Assembly Constituency) चांगलाच चर्चेत आला आहे. माढ्यातून महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता असतानाच, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे शिवतेजसिंह मोहिते-पाटील (Shivtej Singh Mohite-Patil) यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. काल शारदीय नवरात्रोत्सवाच्या आणि घटस्थापनेच्या निमित्ताने मोहिते-पाटील समर्थकांनी शिवतेजसिंह यांना उमेदवारी मिळावी, यासाठी माढा मतदार संघातील महाळुंग येथील यमाई देवीला साकडे घातले आहे.
माढ्याचे आमदार बबन शिंदे हे अजित पवार (Ajit Pawar) गटासोबत गेल्याने शरद पवार (Sharad Pawar) पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी संजय कोकाटे यांनी पदाधिकारी मेळावा घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे. कोकाटे यांच्या मागणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राम मस्के यांनी जाहीरपणे शिवतेजसिंह यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता माढ्यात उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे.
अशातच मोहिते पाटील यांनी उमेदवारी मिळावी यासाठी जोर लावल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये भाजप आमदार रणजितसिंह मोहिते व अकलूजचे माजी सरपंच शिवतेज मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. उमेदवारीसाठी मोहिते पाटील समर्थकांचा दिवसेंदिवस दबाव वाढू लागल्याचे दिसू लागले आहे. आज मोहिते पाटील समर्थकांनी महाळुंग येथील यमाई देवीच्या चरणी साकडे घालून शिवतेजसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे.
माढ्यातून विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, माढ्याच्या नगराध्यक्ष मीनल साठे यांनी तर यापूर्वी मतदारसंघात सभा, बैठका सुरू केल्या आहेत. मीनल साठे आणि अभिजीत पाटील हे देखील शरद पवारांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आता शरद पवार माढ्यातून कोणाला उमेदवारी देतात याकडेच लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.