Temple And masjid Sakal
सोलापूर

सोलापूर : मंदिर- मशिदींमध्‍ये भेदभाव कशासाठी?

सुधाकर इंगळे महाराज; धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीची सक्ती नको

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - मंदिराकरिाता स्पीकर परवानगीसाठी धर्मदाय आयुक्तांच्या पत्राची मागणी केली जात आहे. मशिदीला मात्र वक्फ बोर्डाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जात आहे. पोलिस प्रशासनाने मंदिर- मशिदीमध्ये भेदभाव करू नये, वक्फ बोर्डाप्रमाणे मंदिर समितीचेही पत्र ग्राह्य धरावे, अशी मागणी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महराज इंगळे यांनी केली आहे. महाराष्ट्रातील सर्व मंदिरांमधील स्पीकर परवानगीचा शासनाने एकच आदेश काढून मंजुरी जाहीर करावी. प्रत्येक मंदिराला वेगवेगळी मंजुरी घेण्यासाठी भाग पाडू नये, असेही त्यांनी या निवनेदानात म्हटले आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना ईमेलद्वारे ही मागणी करण्‍यात आली आहे.

वारकरी संप्रदाय हा कीर्तन व प्रवचन हे केवळ धर्मकारण म्हणून स्वीकारत नसून समाज प्रबोधन - जनजागृती या विचाराने करत आहेत. कीर्तन हे फक्त पूजापाठ, नित्यनेम, विधी नसून समाज घडविण्याचं श्रेष्ठ माध्यम आहे. समाज मनावर संस्कार करून त्यांना स्थिर करण्याचा प्रयत्न कीर्तन परंपरा करत आहे. समाजाला दिशा देण्याचे मोलाचे कार्य या परंपरेकडून सातत्याने घडत आहे. त्यामुळे कीर्तनाकडे पाहताना समाज उपयोगी प्रभावी व सर्व मान्य माध्यम आहे, असे पाहावे. त्यामुळे प्रत्येक मंदिराने स्वतंत्र परवाना काढण्या पेक्षा महाराष्ट्र शासनाने सामाजिक गरज म्हणून सर्वाना एकच परवानगी जाहीर करावी, अन्यथा महाराष्ट्रात सर्व मंदिरात तीव्र आंदोलन करू असा इशारा वारकरी मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

Latest Maharashtra News Updates : युगेंद्र पवारांच्या सांगता सभेत शरद पवारांंचं भाषण

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Winter Detox Tea: हिवाळ्यातच नाही तर बाराही महिने हे पेय तुम्ही पिऊ शकता. चरबी घटवण्यासह देते इतरही आरोग्याचे फायदे

SCROLL FOR NEXT