Solapur Crime. sakal
सोलापूर

मुलीच्या वाढदिनीच वडिलाकडून पत्नीचा खून! दारुच्या नशेत पोलिस ठाण्याकडे निघालेल्या पतीने सांगितले खुनाचे कारण, पतीला 2 दिवसांची पोलिस कोठडी

दोन मुली असल्याने पतीने कामधंदा करावा म्हणून पत्नी सतत तगादा लावत होती. पण, तुळजाराम गुजराती (रा. अविनाश नगर, एमआयडीसी रोड) याला दारूचे व्यसन होते आणि तो पत्नीच्या सततच्या किरकिरीला वैतागला होता. सोमवारी रात्री मोठ्या मुलीचा वाढदिवस साजरा झाल्यावर बायकोची किरकिर पाहून त्याने डोक्यात दगड घालून तिचा खून केला.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : दोन मुली असल्याने पतीने कामधंदा करावा म्हणून पत्नी सतत तगादा लावत होती. पण, तुळजाराम गुजराती (रा. अविनाश नगर, एमआयडीसी रोड) याला दारूचे व्यसन होते आणि तो पत्नीच्या सततच्या किरकिरीला वैतागला होता. सोमवारी (ता. ७) रात्री मोठ्या मुलीचा वाढदिवस साजरा झाल्यावर बायकोची किरकिर पाहून त्याने तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला म्हणून संशयित आरोपीने पोलिसांना सांगितले आहे. तत्पूर्वी, पत्नीचा खून केल्यानंतर तो पोलिस ठाण्याच्या दिशेने निघाला होता. वाटेतच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील अविनाश नगरात राजेश्री व तुळजाराम हे दोन लहान मुलींसोबत राहायला होते. पत्नी राजेश्री ही तुळजाराम याच्या जवळील नात्यातील होती. मोठी मुलगी नऊ वर्षांची तर लहान मुलगी सात वर्षांची आहे. सोमवारी मोठ्या मुलीचा वाढदिवस होता. त्या दिवशी वाढदिवस साजरा करण्याचे ठरलेले असतानाही तुळजाराम नशेत घरी आला होता. पत्नी राजेश्री हिने मोठ्या मुलीचा वाढदिवस साजरा केला आणि पती दारू पिऊन आल्याने त्याला किरकिर करू लागली. त्या रागात त्याने राजेश्रीच्या डोक्यात झोपेतच दगड घातला आणि फरशीवर डोके आदळल्याने त्यात तिचा जागेवरच मृत्यू झाला.

पत्नी मृत झाल्याने तो स्वत: एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर होण्यास निघाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. राजेश्री ही रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली होती. पोलिसांनी संशयित आरोपी तुळजारामला अटक केली. त्यावेळीही तो दारूच्या नशेतच होता, असे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी (ता. ८) पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. सहायक पोलिस निरीक्षक भरत चंदनशिव तपास करीत आहेत.

दोन्ही चिमुकल्या पोरक्या

राजेश्री व तुळजाराम यांना दोन मुली आणि त्याही एक नऊ वर्षांची तर दुसरी सात वर्षांची आहे. वडिलाने आईचा खून केल्याने ती या जगात राहिली नाही. आईच्या खुनात वडील अटकेत असल्याने आता त्या दोन्ही मुली आता पोरक्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT