अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नी व तिच्या प्रियकराने खून केल्याची घटना वडाचीवाडी हद्दीत २६ ते २८ एप्रिल या कालावधीत घडली. दरम्यान मिसिंग वरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तब्बल १७ दिवसांनी खुनाला वाचा फुटली. दादासाहेब हनुमंत पवार (वय ३६) हिवरे (ता मोहोळ) असे खून झालेल्याचे नाव आहे.
२८ एप्रिल रोजी परमेश्वर पिंपरी (ता. मोहोळ) हद्दीतील उजनी कालव्यात एक ३५ ते ४० वयोगट असलेला मृतदेह पाण्यात वाहत येऊन पाईपलाईनला अडकला होता. त्याच्या अंगावर व डोक्याच्या मागील बाजूस जखमा झाल्या होत्या.
मोहोळचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ ठाण्यातील हवालदार संतोष चव्हाण यांनी या गुन्ह्याच्या तपास केला. कामती पोलिसांनी याबाबत मिसिंग दाखल केले होते. सदरचा मृतदेह दादासाहेब पवार याचाच असल्याचे समोर आले. त्यानंतर कामती पोलिसांनी मोहोळ पोलिस ठाण्याकडे तपास वर्ग केला.
दरम्यान खुनाचा उलगडा असा झाला की कोन्हेरी (ता. मोहोळ) येथील अमोल ऊर्फ कृष्णा अंगद पांढरे हा दुधाचा व्यवसाय करीत होता. तो दादासाहेब पवार याच्या हिवरे शिवारातील वस्तीवर जाऊन सहा महिन्यांपासून दूध काढून घेऊन येत होता. त्यामुळे दादासाहेबची पत्नी रंजना व अमोल पांढरे यांच्यात प्रेम संबंध जुळून आले होते.
हे दादासाहेब याला समजल्यावर त्या पती-पत्नीत भांडणे होऊ लागली. वाद वाढू नये म्हणून दादासाहेब याचे नातेवाईक व अमोल पांढरे यांचे नातेवाईक यांनी एकदा एका हॉटेलमध्ये हे प्रकरण मिटवले होते, व अमोलला ताकीद दिली होती. तरीही अमोल हा रंजनाला भेटण्यासाठी जातच होता. पुन्हा पती-पत्नीत भांडणे सुरू झाली होती.
आपल्या प्रेम संबंधात हा पती अडसर ठरतो म्हणून रंजना व अमोल यांनी २६ ते २८ एप्रिलच्या दरम्यान रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दादासाहेब याचा खून करून मृतदेह कालव्यात फेकला. याप्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल जीवराज जनार्दन कासवीद यांनी फिर्यादी दिली असून अधिक तपास मोहोळ पोलिस करीत आहेत
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.