bribe crime Sakal
सोलापूर

Sangola News : महिला सरपंच व त्यांच्या पतीविरुद्ध दहा हजार रुपयांची लाच स्वीकारलेबाबत गुन्हा दाखल

ग्रामपंचायतमधील केलेल्या कामाचे बिल देण्यासाठी सरपंचाच्या पतीला दहा हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.

दत्तात्रय खंडागळे

सांगोला - ग्रामपंचायतमधील केलेल्या कामाचे बिल देण्यासाठी सरपंचाच्या पतीला दहा हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. याबाबत आलेगाव ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच नंदाबाई पांडुरंग दिवसे व त्यांचे पती पांडुरंग रामचंद्र दिवसे (रा. आलेगाव, ता. सांगोला) यांचेविरुद्ध लाचलुपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आलेगाव (ता. सांगोला) येथील बाबरवाडी हनुमान मंदिरासमोरील सभागृहाचे तक्रारदारास काम मिळाले होते. हे काम तक्रारदाराने पूर्ण केल्याने त्यांनी बिल मिळण्यासाठी ग्रामपंचायत येथे पाठपुरावा केला.

याबाबत आलेगाव येथील ग्रामपंचायतच्या महिला सरपंच यांचे पती पांडुरंग दिवसे यांनी तक्रारदार यांच्याकडे आठ हजार रुपये लाचेची मागणी केली. यामुळे तक्रारदार यांनी अँटीकरप्शन ब्युरो, सोलापूर यांना तक्रार दिली. तक्रारीच्या अनुषंगाने 17 जानेवारी, 23 जानेवारी व 29 जानेवारी रोजी पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी केली असता, पांडुरंग रामचंद्र दिवसे यांनी तक्रारदार यांच्याकडे यापूर्वी केलेल्या कामाचे दोन हजार रुपये व सध्याचे कामाचे आठ हजार रुपये असे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

याबाबत महिला सरपंच यांच्याकडे पडताळणी केली असता त्यांनी लाचेची रक्कम त्यांचे पती पांडुरंग दिवसे यांच्याकडे देण्यास सांगितले. दिनांक 15 फेब्रुवारी रोजी येथील तक्रारदार यांनी महिला सरपंच यांचे पती यांची भेट घेऊन बिलाचा विषय काढला असता महिला सरपंचाचे पती यांनी तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रुपयाची लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

याबाबत आलेगावच्या महिला सरपंच नंदाबाई पांडुरंग दिवसे व त्यांचे पती पांडुरंग रामचंद्र दिवसे (रा. आलेगाव, ता. सांगोला) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत विभागाच्या वतीने पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार प्रमोद पकाले, पोलीस कॉन्स्टेबल गजानन किणगी, राहुल गायकवाड, शाम सुरवसे यांनी सापळा रचला होता.

सांगोला तालुक्यात खळबळ -

सांगोला तालुक्यात विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आला आहे. परंतु ग्रामपंचायत व इतर विभागांमध्ये काम केलेल्या कामांच्यासाठी लाचेची मागणी होत असल्याची चर्चा सुरू होती. आलेगाव येथील सरपंच व त्यांचे पती विरोधात लाचेची मागणी केल्याने गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT