सोलापूर : जिल्ह्यात एड्सग्रस्तांच्या संख्येचा आकडा सातत्याने घटत चालला आहे. एचआयव्हीग्रस्त आई-वडिलांना होणाऱ्या बालकांना एचआयव्हीची लागण असण्याचे प्रमाण देखील केवळ 0.53 टक्क्यांवर आले आहे.
जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने एड्स रुग्णांच्या संदर्भात सातत्याने कार्य केले जाते. समाजात एड्सची लागण होऊ नये यासाठी देखील सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. जिल्हाभरातील विविध शासकीय रुग्णालये व केंद्रांत एचआयव्ही चाचणी करून दिली जाते. तसेच एचआयव्हीग्रस्त रुग्ण आढळल्यास त्यांना आवश्यक ते उपचार दिले जातात.
एचआयव्हीग्रस्त व्यक्तींच्या बालकांना त्याच्या आई-वडिलांकडून एड्सची लागण होऊ शकते. यासाठी गर्भवती मातांची तपासणी देखील केली जाते. गर्भवती मातांना होणारी बालके ही एड्सग्रस्त होऊ नयेत याचीही काळजी घेतली जाते. मागील काही वर्षात सुरु असलेल्या या कामगिरीने एड्सग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत चालली आहे. यासाठी जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीकडून सातत्याने प्रयत्न केले जातात.
आकडे बोलतात
मागील वर्षभरातील एचआयव्ही चाचण्यांची संख्या : 1 लाख 16 हजार 548
एचआयव्हीबाधित व्यक्तींची संख्या : 621
बाधितांची टक्केवारी : 0.53 टक्के
चाचणी केलेल्या गर्भवती मातांची संख्या : 1 लाख 10 हजार 588
बाधित गर्भवती मातांची संख्या : 30
बाधित मातांची टक्केवारी : 0.02 टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.