jai shri ram sakal
सोलापूर

Ayodhya Ram Mandir : पोस्टकार्डावर लिहिले १०८ वेळा जय श्रीराम

अक्षरमित्राची अयोध्येतील रामलल्ला प्रतिष्ठापनेसाठी अनोखी रामभक्ती

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सध्या अयोध्येसह संपूर्ण जग भगवान रामलल्लाच्या आगमनाची, मूर्ती स्थापनेची आतुरतेने वाट पाहत असताना, सोलापुरातील तरुण तरी मागे कसे राहतील? अशीच प्रचिती सोलापुरात आली आहे. अक्षरमित्र अभिजित भडंगे यांनी पोस्टकार्डावर चक्क एकशे आठ (१०८) वेळा ‘जय श्रीराम‘ हा चैतन्यदायी जपमंत्र सुंदर हस्ताक्षरात लिहिला आहे.

स्वतः तयार केलेल्या कटनिबच्या शाईपेनने त्यांनी ही ‘रामभक्ती‘ साकारत रामनामाचा जप केला आहे. यासाठी त्यांना तब्बल दोन तास वीस मिनिटे एवढा वेळ द्यावा लागला. प्रत्येक दहावा जप त्यांनी ‘लालशाई‘ मध्ये लिहिला. हिंदू धर्मात १०८ अंक हा जपासाठी, प्रदक्षिणेसाठी, दानासाठी अतिशय शुभ मानला जातो.

पोस्टकार्डच्या पुढच्या बाजूस ८४ व मागील बाजूस २४ वेळा, असे एकूण १०८ वेळा अक्षरमित्र अभिजित भडंगे यांनी काळ्या व लाल रंगाच्या सुंदर हस्ताक्षरात जय श्रीराम लिहीत अनोख्या पद्धतीने भगवान प्रभू श्रीरामचंद्रांची अक्षरभक्ती केली आहे.

तसेच सोलापूरमध्ये चित्रकार, नृत्य, शिल्प, गायन, वादन असे विविध क्षेत्रात असंख्य कलाकार आहेत. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने भगवान रामाला अभिवादन करत जल्लोष करत हा उत्सव अधिक संस्मरणीय करावा, असे आवाहन अक्षरमित्र अभिजित भडंगे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamala Harris vs Donald Trump election : डोनाल्ड ट्र्म्प आघाडीवर... पण कमला हॅरिस यांचा कमबॅक शक्य; अंतिम निकाल कधी लागणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Captain David Warner: बंदी हटली अन् डेव्हिड वॉर्नरकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली; ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधून मोठी बातमी

Mumbai Weather Update: येत्या काही दिवसात कसं असेल मुंबईचं तापमान? जाणून घ्या एका क्लिकवर..

Andhari Vidhansabha: ऋतुजा लटके पुन्हा मारणार बाजी की मुरजी पटेल देणार धोबीपछाड? अंधेरी पूर्वेत दोन्ही शिवसेनांमध्ये चुरशीची लढत

SCROLL FOR NEXT