Solapur News sakal
सोलापूर

Solapur News : जि. प. शिक्षण विभाग अलर्ट;गणवेश बंधनकारक, मोबाईल वापरावर निर्बंध

लातूरमधील नीट पेपरफुटीप्रकरणी निलंबित शिक्षक संजय जाधव याच्या प्रकरणानंतर प्राथमिक शिक्षण विभाग ॲलर्ट झाला असून शिक्षकांसाठी नियमावली बनविली आहे. गणवेशाच्या बंधनासह मोबाईल वापरावर निर्बंधाचा त्यात समावेश आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : लातूरमधील नीट पेपरफुटीप्रकरणी निलंबित शिक्षक संजय जाधव याच्या प्रकरणानंतर प्राथमिक शिक्षण विभाग ॲलर्ट झाला असून शिक्षकांसाठी नियमावली बनविली आहे. गणवेशाच्या बंधनासह मोबाईल वापरावर निर्बंधाचा त्यात समावेश आहे. त्याबाबत लवकरच शिक्षकांना लेखी व बैठका घेऊन तोंडी सूचना देण्यात येणार आहेत. त्याचा भंग केल्यास शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

नीटप्रकरणी टाकळी टें (ता. माढा) येथील शिक्षक संजय जाधव याला एटीएसने अटक केल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, तो लातूरमध्ये क्लास चालवायचा. त्यासाठी सहजपणे ये - जा करता यावे, यासाठी त्याने आंतरजिल्हा बदलीत टाकळी येथील शाळा निवडली. तसेच पत्नी मनोरुग्ण असल्याच्या प्रमाणपत्राद्वारे संवर्ग एकमधून अक्कलकोट तालुक्यात बदली मिळविली.

पत्नी मनोरुग्ण असल्याच्या प्रमाणपत्राची प्राधिकृत यंत्रणेकडून खातरजमा केली जाणार आहे. तर चौकशीत तो दीर्घ रजेवर गेला नसल्याची व पोटशिक्षक नेमला नसल्याचे आढळले असले तरी त्याच्याकडून लातूरमध्ये चालवले जाणारे क्लास, नीट पेपर फुटीतील त्याचा सहभाग आणि १२ जूनपासून बेकायदा शाळेवरील त्याची गैरहजेरी याची जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी नियमावली तयार केली आहे. शाळेच्या वेळेत शिक्षकांनी पूर्ववेळ हजर राहणे, खासगी क्लास न चालविणे हे बंधनकारक असले तरी त्यात काही नव्या नियमांचा समावेश केला आहे. त्याबाबत शिक्षकांना लेखी व बैठका घेऊन तोंडी सूचना देण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले.

शिक्षकांसाठी अशी राहील नियमावली

  • निर्धारित वेळेत पूर्णवेळ शाळेत रहावे

  • शिक्षकांसाठी गणवेश निश्चित करणार

  • शाळेच्या वेळेत त्या गणवेशातच असावे

  • शाळेच्या वेळेत मोबाईलचा वापर करता येणार नाही

  • खासगी शिकवणी वर्ग चालवता येणार नाही

शिक्षक संजय जाधव याचा नीट पेपर फुटीतील सहभाग आणि बेकायदा गैरहजर राहण्याची बाब गंभीर आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. शिक्षकांकडून असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी नवी नियमावली तयार केली आहे. त्यांना गणवेश बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यांनी शाळेच्या वेळेत पूर्णवेळ गणवेशात हजर असावे. मोबाईलच्या वापरावर निर्बंध घालण्यात येईल. त्यांना खासगी शिकवणी वर्ग चालवता येणार नाही. असे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

-कादर शेख, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: फुलंब्री विधानसभा संघात अनुराधा चव्हाण 28900 मताने आघाडीवर

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT