Crime News esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Crime : स्थावर मालमत्तेसाठी विहापुरात बापाचा खून; घर, शेतजमीन नावावर करीत नसल्याने कृत्य

सकाळ वृत्तसेवा

कडेगाव : विहापूर येथे घर व शेतजमीन नावावर करीत नसल्याच्या रागातून मुलाने बापाच्या डोक्यात, खांद्यावर लाकडी दांडक्याने जबर मारहाण करीत तोंड, डोके फरशीवर आपटून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. तानाजी यशवंत माने (वय ७० रा. विहापूर) असे मृताचे नाव आहे.

संशयित प्रदीप तानाजी माने याच्याविरोधात कडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मृत तानाजीची पत्नी मंगल तानाजी माने यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, या घटनेने विहापूरवर शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः तानाजी माने विहापूर येथील रहिवाशी असून त्यांचा मुलगा संशयित प्रदीप माने याला दारूचे व्यसन आहे. अनेक दिवसांपासून तो घर व जमीन नावावर करा म्हणून वडिलांशी वाद घालत होता. दरम्यान, काल (शनिवारी) दुपारी प्रदीप दारू पिऊन घरी आला.

स्थावर मालमत्तेसाठी

विहापुरात बापाचा खून यांच्यासोबत घर व शेतजमीन नावावर करण्यावरून वाद घालू लागला. त्यानंतर रागाच्या भरात व दारूच्या नशेत वडील तानाजी यांना लाकडी दांडक्याने डोक्यात, खांद्यावर जबर मारहाण केली. त्यांचे तोंड व डोके फरशीवर आपटले. यात तानाजी गंभीर जखमी झाले.

त्यांना सांगलीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आज (रविवारी) त्यांचा मृत्यू झाला. कडेगावचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT