झरे : झरे (ता. आटपाडी) परिसरामध्ये टेंभू योजनेचे पाणी आल्यामुळे फोंडे माळ सुद्धा हिरवगार दिसू लागलं आहे. झरे, पारेकरवाडी व कुरुंदवाडी च्या काही भागाला टेंभूचे पाणी आले आहे. त्यामुळे या गावातील शेतकरी सुखी झाले आहेत. बागायत क्षेत्र वाढले आहे. त्यामध्ये द्राक्षे, आंबा, ऊस लागवडीमध्ये वाढ झाली आहे.
उर्वरित विभूतवाडी, गुळेवाडी व कुरुंदवाडी चा काही भाग टेंभू योजनेच्या पाण्यापासून वंचित आहे. त्यामुळे या गावांना सतत दुष्काळाशी तोंड द्यावे लागत आहे. वरील तीन गावांना टेंभू योजनेचे पाणी मिळाल्यास या गावांचे नंदनवन होईल फळबागा ,ऊस लागवड वाढेल. जनावरे वाढतील त्यामुळे दुधाचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालेल.
झरे सजा मध्ये झरे, कुरुंदवाडी विभूतवाडी, गुळेवाडी व पारेकरवाडी या गावांचा समावेश होत आहे. यामध्ये झरे, पारेकरवाडी या गावांना टेंभूचे पाणी आले आहे.पण काही भाग पाण्याविना वंचित आहे. तर कुरुंदवाडी मध्ये काही क्षेत्राला पाणी आले आहे. परंतु उर्वरित भाग वंचित आहे. त्याचबरोबर विभुतवाडी गुळेवाडी या गावांचा संपूर्ण भाग पाण्यापासून वंचित आहे. या गावाला टेंभू योजनेचे पाणी आल्यास बागायत क्षेत्र निश्चितपणे वाढेल.
सध्या सरासरी टेंभूच्या पाण्यावर व विहिरीच्या पाण्यावर सरासरी 122 एकर द्राक्ष बाग लागवड झालेली आहे. 224 एकर उसाची लागवड झालेली आहे. उर्वरित 102 एकर च्या आसपास इतर फळबाग लागवड झालेली आहे. विभूतवाडी गुळेवाडी या गावांमध्ये अनेक वेळा टॅंकरने पाणी घालून द्राक्ष बागा जगवल्या आहेत. या गावांना टेंभू योजनेच्या पाण्याचा लाभ होत नाही. जर टेंभू योजनेचे पाणी वंचित गावांना मिळाले तर ऊस व फळबाग लागवडीत निश्चितपणे वाढ होईल व परिसराचे नंदनवन होईल.
सध्याची परिस्थिती
224 एकर ऊस लागवड,
122 एकर द्राक्ष लागवड,
102 इतर फळबाग लागवड झाली आहे.
संपादन : प्रफुल्ल सुतार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.