Stop on Kolhapur-Dhanbad Express at Jatroad 
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर-धनबाद एक्‍सप्रेसला जतरोडवर थांबा

बादल सर्जे

जत : शिवजयंतीच्या मुहूर्तावर नव्याने सुरू झालेल्या कोल्हापूर-धनबाद दीक्षाभूमी साप्ताहिक एक्‍सप्रेस गाडीचे जतरोड (वाळेखिंडी) रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी सकाळी स्वागत करण्यात आले. या लांब पल्ल्याच्या गाडीला थांबा मिळाल्याने नागरिकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. 

दरम्यान, या गाडीचे स्वागत झाल्यानंतर येथील रेल्वे कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजी शिंदे, स्टेशन प्रबंधक विनय प्रसादजी, प्रशांत विभूते, संभाजी शिंदे, विजय पाटील, तानाजी शिंदे, भीमराव शिंदे, सतीश शिंदे, दिगंबर शिंदे, आशिष शिंदे, महादेव हिंगमिरे, उपस्थित होते. 

एक्‍सप्रेसच्या नियोजनात जत रोड स्टेशन थांबा नव्हता. गाडीच्या थांब्यासाठी शामसुंदर मनधना व केंद्रीय रेल्वे बोर्डाचे सदस्य सोलापूर विभागाचे प्रकाश जमदाडे, एन.डी. शिंदे, नझिर नदाफ, किरण इतापे, यांनी प्रयत्न केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले. वाळेखिंडी येथे जत तालुक्‍यातील एकमेव स्टेशन आहे. परंतु, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या येथे थांबत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी पाठपुरावा करून जत तालुक्‍यात या गाड्या थांबवण्यासाठी प्रयत्न केले तसेच खासदार संजय काका पाटील यांनी देखील तालुक्‍यातील रेल्वेचे प्रश्न सुटण्यासाठी मदत केली. 

अशी धावणार दीक्षा एक्‍सप्रेस.. 
19 फेब्रुवारीपासून दर शुक्रवारी सकाळी 04:35 वाजता कोल्हापूर मधून निघून मिरज, कवठेमहांकाळ थांबा घेऊन जतरोडला सकाळी 07:20 वाजता येऊन 07:21 वाजता निघेल. ही गाडी सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, नांदेड, आदिलाबाद, नागपूर, इटारसी, जबलपूर, वाराणसी, गया मार्गे धनबादला रविवारी सकाळी 08:35 वाजता पोहोचेल. परतीची गाडी दर सोमवारी सकाळी 10:20 वाजता धनबाद मधून निघून जतरोड येथे बुधवारी सकाळी 08:55 वाजता येऊन 08:56 वाजता निघेल आणि ला दुपारी 12:40 वाजता पोहोचेल. या गाडीला 1 वातानुकूलित द्वितीय श्रेणी, 3 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 10 शयनयान, 5 जनरल डबे आहेत. आपल्याला मोबाईलद्ववारे कुठूनही या रेल्वेचे जतरोड रेल्वे स्टेशनचे आरक्षण करता येईल. जत शहर ते जत रोड-23 कि.मी. अंतर असून जत रोड रेल्वे स्टेशन जत-सांगोला एन एच 965 जी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शेगावहून 10 कि.मी आणि सिग्नहळ्ळीहून 5 कि.मी. अंतरावर आहे. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT