कुकुडवाड (जि. सातारा) : राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील शाळांमधून शालेय पोषण आहार आणि पूरक आहार अंतर्गत सहा महिन्यांसाठी आठवड्यातून तीन दिवस अंडी, दूध आणि फळांचा आहार दिला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अंडी खाण्याची सवय लागली आहे. मात्र, पूरक-पोषण आहार योजना बंद झाल्याने पंचाईत झाली आहे. "गुरुजी, आम्हाला पिवळा भात नको, अंडीच द्या,' असे विद्यार्थी म्हणत आहेत.
हेही वाचा - हो...त्याने केले क्षणांत 50 हजार परत
माण तालुक्यात जिल्हा परिषद, अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून हा आहार दिला जात होता. शासनाने घोषित केलेल्या दुष्काळी गावांतील शाळांना पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीतही पोषण आहार देण्याचा निर्णय घेतला होता.
सुटीत विद्यार्थ्यांनी पोषण आहाराकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते. अनेक ठिकाणी कागदोपत्रीच खिचडी शिजल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर पोषण आहाराबरोबर आठवड्यातून तीन दिवस पूरक आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार दुष्काळग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यापासून पूरक आहार देण्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित शाळा प्रशासनास देण्यात आले होते. मात्र, आता ही योजनाच बंद झाली आहे.
नक्की वाचा - इतिहासातील सातारा : म्हणून संबोधतात पानिपतकार शिंदे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.