आम्ही सहकुटुंब सहलीसाठी इजिप्त निवडलं. मी, पत्नी शैला, मुली सायली व मंजुषा निघालो. चार हजार वर्षांहून अधिक जुना, पुरातन देश इजिप्त.
आम्ही सहकुटुंब सहलीसाठी इजिप्त निवडलं. मी, पत्नी शैला, मुली सायली व मंजुषा निघालो. चार हजार वर्षांहून अधिक जुना, पुरातन देश इजिप्त. जगभरातले पर्यटक प्रचंड संख्येने आले होते. त्यात आम्ही ज्या दुकानात, हॉटेलमध्ये जाऊ तेथे ‘तुम्ही इंडियातून आला आहात का?’ असं विचारायचं. आम्ही ‘होय’ म्हणायचा अवकाश, ते विचारायचे, ‘बच्चन, शाहरूखचा इंडिया... ’ इतकी क्रेझ आहे तिथे या दोन सुपर स्टार्सची. त्या देशाने आपली संस्कृती आणि सांस्कृतिक स्थळे मोठ्या प्रयत्नांनी जतन केली आहेत. त्याविषयी त्यांच्या मनात अतीव प्रेम आहे.
- सुहास पाटील (सचिव, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी)
काही निमित्ताने इजिप्तविषयी खूप ऐकले होते. त्या देशाची ओढ होती. ती पूर्ण झाली. पुनर्जन्मावर प्रचंड विश्वास असलेला इजिप्त देश पाहताना थक्क व्हायला होते.
‘फेरोज’ म्हणजे तिथले राजे. हजारो वर्षांपूर्वी त्यांनी अत्यंत सुंदर मंदिरे बांधली. पिरॅमिड बांधले. पिरॅमिड म्हणजे काय, तर तेथील राजांनी पुढच्या जन्माची तयारी करत शेवटचा श्वास घेतलेली जागा. ती तयारी म्हणजे सोने-नाणे, कपडे, स्वतंत्र दालन, नोकरांसाठी कक्ष... आदी. ते आजही त्याच स्थितीत जतन केले आहे. अनेक मृतदेहांचे केस, दात, नखे जशीच्या तशी आहेत. पिरॅमिडची भव्यता पाहून थक्क होते. कोणतीही आधुनिक यंत्रणा नसताना ते बांधकाम कसे केले असेल आणि ते एवढी वर्षे कसे टिकले असेल, याचे आश्चर्य वाटते.
अलेक्झांडर द ग्रेटने वसवलेले अलेक्झांडर शहर, तेथील रचना, सौंदर्य याची भुरळ पडते. सिडाडेल ऑफ कॅट, कॉय राजवाडा, रोमन थिएटर, भव्य ग्रंथालय हा ठेवा अप्रतिम! आपला इतिहास, संस्कृती कशी जपावी, याचा आदर्श वस्तुपाठ. नाईल नदीचा किनारा, नदीची स्वच्छता नजरेत साठवून घेतली. नाईल नदीला सतत महापूर यायचा, म्हणून मोठे धरण बांधले गेले. त्यामुळे पूर थांबला, मात्र बॅक वॉटरमध्ये अनेक गावे बुडाली.
गावांसमवेत प्राचीन मंदिरे बुडणार होती. त्यातील अबू सिंबल आणि फिले ही दोन मंदिरे जशीच्या तशी उचलून अन्यत्र उभारण्यात आली. हा वारसा जतन करायला ‘यूनेस्को’ने मदत केली. लक्सर व आसवान या गावांमधील मंदिरे होती. ही गावे अन्यत्र वसवली गेली. त्या गावांना आम्ही भेट दिली. त्या गावांत आजही एकत्र कुटुंबपद्धती कायम आहे. त्याचे भारी कौतुक वाटले. त्या लोकांनी घरी मगर पाळल्याचे पाहून धक्काच बसला. ते लोक मगरींना ‘पॉझिटिव्ह पॉवर’ मानतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.