Ishwar Shingate Sakal
पश्चिम महाराष्ट्र

वाळव्यात द्राक्षउत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या

रात्री दहाच्या सुमारास वाळवा- इस्लामपूर रस्त्यावर मोहिते मळा भागात ही घटना उघडकीस आली.

सकाळ वृत्तसेवा

रात्री दहाच्या सुमारास वाळवा- इस्लामपूर रस्त्यावर मोहिते मळा भागात ही घटना उघडकीस आली.

वाळवा - येथील द्राक्षउत्पादक (Grapes Productive) शेतकऱ्याने गळफास (Farmer Suicide) घेऊन आत्महत्या केली. ईश्वर सखाराम शिऺगटे (वय ६०) असे त्यांचे नाव आहे. काल (ता. २२) रात्री दहाच्या सुमारास वाळवा- इस्लामपूर रस्त्यावर मोहिते मळा भागात ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी आष्टा पोलिसांत नोंद आहे. सधन आणि शांत स्वभावाच्या शिंगटे यांनी कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे अस्पष्ट आहे.

द्राक्षे उत्पादनात आघाडीचे शेतकरी म्हणून ईश्वर शिंगटे यांची ओळख होती. त्यांचे मूळ गाव शिंगटेवाडी (ता. शिराळा) आहे. सुमारे ३० वर्षांपासून ते येथील मोहिते मळा भागात त्यांच्या सासरवाडीत राहत होते. त्याची स्वत:ची एकरभर शेती आहे. शिवाय, तीन एकर शेती त्यांनी कसण्यासाठी घेतली.

दोन एकरांत द्राक्षबाग आहे. ते आणि त्यांचा मुलगा प्रमोद हे शेती करत होते. ईश्वर शिंगटे शेतीत अव्याहतपणे राबत होते. शिवाय इतर कोणता त्रास त्यांना नव्हता. काल (मंगळवारी) दुपारी त्यांनी शेतातील कूपनलिकेला विधिवत परडी सोडली. त्यानंतर चुलत मेहुणे अनिल थोरात यांच्याशी जवळपास दोन तास गप्पा मारल्या. रात्री आठच्या सुमारास त्यांनी जेवण केले. त्यानंतर ते बागेत फिरायला म्हणून गेले. दहा वाजले तरी ते घरी परतले नाहीत. त्यामुळे घरच्या लोकांनी शोधाशोध सुरू केली. तर घरापासून काही अंतरावर त्यांच्या द्राक्षबागेजवळ असलेल्या लिऺबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले. या घटनेची माहिती मेहुणे अमर हणमंत थोरात यांनी आष्टा पोलिसांत दिली. मध्यरात्री पोलिसांनी पंचनामा केला. आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या मूळ गावी सकाळी अंत्यसंस्कार केले. पोलिस नाईक सी. जी. ठाकूर तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT