बेळगाव : बेळगाव जिल्ह्यास दररोज १५ हजार अतिरिक्त लसींचा पुरवठा करण्यात येणार आहे. शिवाय दररोज ४० हजार जणांना लस देण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पीकहानीसह घरांचा सर्व्हे करून अहवाल द्यावा, अश्या सूचना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना दिल्या. मुख्यमंत्री शनिवारी (ता. २१) बेळगाव दौऱ्यावर आले असता येथील सुवर्ण सौधमध्ये झालेल्या विकास आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यासाठी एक कोटी लशींची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली असल्याचे यावेळी बोम्मई यांनी सांगितले. लसींची कमतरता भासू नये, यादृष्टीने आवश्यक सुविधांची व्यवस्था करावी. राज्यात कोविडवर नियंत्रण मिळवण्यात सरकार यशस्वी ठरले आहे. तर बेळगाव जिल्ह्यातही पॉझिटिव्हीटी दर कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात बेळगावसह गोकाक, चिकोडी, सौंदत्तीसह एकूण १० ठिकाणी ऑक्सिजन उत्पादन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. येत्या २० दिवसांत सर्व केंद्रांची कामे पूर्ण होणार आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिली.
पुरपरिस्थिती बाबत सर्व्हे सुरू असून पीकहानी आणि पडझड झालेल्या घरांचे सर्व्हे काम लवकर पूर्ण करून अहवाल पाठवण्याची सुचना जिल्हाधिकाऱ्यांना केली असल्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, खासदार मंगल अंगडी, राज्यसभा सदस्य इराण्णा अंगडी, विधान परिषदेचे मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ आदी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.