बेळगाव : विधान परिषद निवडणूक (Vidhan Parishad Election Result ) निकाल व मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुवर्णसौधमध्ये (Suvarnasoudh)बुधवारी (ता. १५) दिवसभर रंगली. विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला (BJP) अपेक्षित यश मिळाले नाही. विधान परिषद निवडणुकीतही बेळगाव (Belgaum)जिल्ह्यात अनपेक्षित निकाल लागला. यामुळे मुख्यमंत्र्यांचे स्थान धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.
विधान परिषद निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार महांतेश कवठगीमठ (Mahantesh Kavathgimath) यांचा पराभव झाला. कॉंग्रेस उमेदवार चन्नराज हट्टीहोळी (Channaraj Hattiholi) आणि अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी (Lakhan Jarkiholi)यांनी बाजी मारली. भाजपसाठी हा निकाल धक्कादायक ठरला आहे. त्याचे खापर माजी मंत्री रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi)यांच्यावर फोडण्यात येत आहे. त्यासोबत राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनाही लक्ष्य करण्याची तयारी सुरु झाल्याचे दिसते. त्यातून मुख्यमंत्र्यांना बदलण्याबाबतची चर्चा विधानसौध परिसरात आमदारांच्या पातळीवर दिसली.
गेल्या महिन्यात मंत्री के. एस. ईश्वराप्पा (K.S.Ishwarappa) बेळगावात आले होते. त्यांनीही याचे संकेत दिले आहेत. त्याशिवाय मुख्यमंत्री वैद्यकीय उपचारासाठी पुढील महिन्यांत विदेश दौऱ्यावर जाणार आहेत. या काळात राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळू शकेल, असे मानले जात आहे. यामुळे बी. एस. येडियुराप्पा (B.S.Yeddyurappa) यांच्याप्रमाणे बसवराज बोम्मई यांना पायउतार व्हावे लागण्याची शक्यता आहे. त्याजागी नव्या चेहऱ्याला संधी मिळेल, असा दावा करण्यात येत आहे.
हट्टीहोळींचा कॉंग्रेसतर्फे सत्कार
नवनिर्वाचीत विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, सलीम अहमद, श्रीनिवास माने यांचा कॉंग्रेस पक्षातर्फे बुधवारी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या, केपीसीसी अध्यक्ष शिवकुमार, एस. आर. पाटील, जी. परमेश्वर, रमेशकुमार, एच. के. पाटीलसह आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.