कवलापूर (सांगली) - कवलापूर, रसुलवाडी गावातील शेतकऱ्यांच्या ऑनलाईन सात-बारावर झालेल्या चुका तत्काळ दुरुस्त कराव्यात, अशी मागणी शेतकरी, ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडे -निवेदनाव्दारे केली आहे. बोजा नोंदी व इतर नोंदीही वेळेवर करुन मिळण्याबाबत निवेदनात मागणी केली आहे. तलाठी, मंडल अधिकाऱ्यांत ताळमेळ नसल्याचे म्हटले आहे.
हे पण वाचा - Republic Day 2020 : आरडी परेड म्हणजे काय रे भाऊ?
निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही गावातील सात-बारा प्रमाणे ऑनलाईन नोंदी नाहीत. ऑनलाईनमध्ये अनेक चुका आहेत. काहींची मुळ पुस्तकात नावे असतानाही ऑनलाईन सात-बारा भरताना तलाठी किंवा ऑपरेटर यापैकी कोणी चुका केल्या हे माहिती नाही. मात्र याला सर्वस्वी तलाठी हेच जबाबदार आहेत. आम्ही झालेल्या चुका तलाठ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. परंतु गेली दीड ते दोन वर्षानंतरही आम्हाला उतारे दुरुस्त करुन मिळालेले नाहीत. काही खातेदारांच्या नावे ऑनलाईन सात-बारा वर जमिनी नाहीत. मुळ पुस्तकात असताना त्यांनी केलेल्या चुकांमुळे आम्हास कर्ज काढणे, इतर बाबींसाठी मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो. बागायत शेती मोठी असल्याने वारंवार उतारे काढावे लागतात. परंतु बॅंका, पतसंस्था, सोसायट्या उताऱ्यामध्ये नावे नसल्याने कर्जही देत नाहीत. आम्ही द्राक्षबागा लागण केल्या असून ऑनलाईन नोंदी अभावी कर्जे मिळत नाहीत. काही लोकांनी खरेदी झाल्यापासून ऑनलाईन रेकॉर्ड सदरी नोंदच झालेल्या नाहीत.
हे पण वाचा - वाढदिवसाला कापला चक्क ३७ किलोचा केक....
तलाठ्यांनी केलेल्या चुकांचे परिणाम खातेदारांना भोगावे लागत आहेत. सरकारी कार्यालयात हेलपाटे मारुन देखील कामे होईनात. तलाठी असे म्हणतात की मी मंडल अधिकारी यांच्याकडे पाठवले आहे. तलाठी मंडल अधिकारी यांच्याकडे नोंदीसाठी पाठवतात आणि मंडल अधिकारी पुन्हा तलाठी यांच्याकडे असे सातत्याने प्रकार घडताहेत. गेली वर्षभर असा खेळ सुरु आहे.
हे पण वाचा - वयाच्या पंचाहत्तरीत ही म्हादूमामाचा हा संर्घष
ऑनलाईन नोंदी, बोजा नोंदी, वारस नोंदी, इ-करार बोजा अशा नोंदीचे फेरफार, वारसदारांचे फेरफार वेळेवर मिळत नाहीत. माझ्याकडे जुनी कामे शिल्लक असून लोकांना टोलवाटोलवीची उत्तरे मिळताहेत. तातडीने नोंदी, दाखले मिळावे. खातेदार व लोकांचा नाहक त्रास कमी करावा, अशी मागणी केली आहे.
ग्रामस्थ प्रकाश पाटील, उदय पाटील, चंद्रकांत पाटील, निवास मोहिते, रामचंद्र नायकवडी, दिलीप कोष्टी, अतुल नलावडे, पांडुरंग पाटील, योगेश बरगाले, बाळासो नलावडे, विजय काटकर, बबन माळी, सुरेखा माळी, महादेव बर्गे, अशोक माळी, प्रशांत हाक्के, तवनाप्पा उपाध्ये, दिनकर पाटील, आकाराम पाटील, गोपालकृष्ण खाडीलकर, गणेश खाडीलकर यांच्या सह्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.