"Tanpure workers' fast continues." 
पश्चिम महाराष्ट्र

"तनपुरे'च्या कामगारांचे उपोषण सुरूच

सकाळ वृत्तसेवा

राहुरी (नगर) : डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे साखर कारखान्याच्या कायम, हंगामी व निवृत्त कामगारांचे बेमुदत उपोषण आज (बुधवारी) दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. उपोषणादरम्यान एका निवृत्त कामगाराला भोवळ आल्याने त्यांना जवळच नातेवाइकांकडे पाठविण्यात आले. परंतु त्यांचे रात्री आठ वाजता हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. त्यांना कारखान्याकडून ग्रॅच्युइटीची काही रक्कम घेणे बाकी होते. याबाबत उपोषणकर्त्यांनी नाराजी व्यक्‍त केली. 

सोपान जगधने (वय 69, रा. टाकळीमियॉं) असे मृत उपोषणकर्त्याचे नाव आहे. उपोषणादरम्यान त्यांना सायंकाळी चार वाजता भोवळ आली होती. कामगारांनी त्यांना घरी पाठविले. ते त्यांच्या बहिणीकडे पिंपळनेर (ता. संगमनेर) येथे गेले होते. तेथे रात्री आठ वाजता हृदयविकाराने मृत्यू झाला. दरम्यान, 246 कामगारांनी उपोषणाची नोटीस दिली होती. पैकी 35 जण आमरण उपोषण, तर 211 जण साखळी उपोषण करीत आहेत.

कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे कारखाना व्यवस्थापनाचे प्रयत्न आज फोल ठरले. राहुरी फॅक्‍टरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ काल (मंगळवार)पासून कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज (बुधवारी) राहुरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी आमरण उपोषण करणाऱ्या कामगारांची आरोग्य तपासणी केली. विद्यमान संचालक मंडळाच्या काळातील मागील दोन वर्षांतील थकीत मासिक वेतनाचे नऊ कोटी, भविष्यनिर्वाह निधीचे अडीच कोटी, निवृत्त कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीचे सहा कोटी रुपये अदा करावेत. यंदा कारखाना बंद असल्याने, कामगारांना दिलेल्या एक वर्ष "लेऑफ'चा कायदेशीर करार करावा. "लेऑफ' कालावधीत कामगार कायद्याप्रमाणे 50 टक्के मासिक वेतन अदा करण्याचे शेड्युल्ड ठरवावे, या मागण्यांवर कामगार ठाम आहेत.

काल (मंगळवारी) प्रभारी कार्यकारी संचालक भाऊसाहेब सरोदे, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी उपोषणस्थळी भेट देऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. आज (बुधवारी) सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागूल व उपनिरीक्षक यशवंत राक्षे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. परंतु यश आले नाही. तसेच गणेश साखर कारखान्याच्या पन्नास निवृत्त कामगारांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांना पाठिंबा दिला. 

जगधने यांच्या मृत्युमुळे कामगार संतप्त 

निवृत्त कामगार सोपान जगधने यांनी काल (मंगळवारी) सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत उपोषणात भाग घेतला होता. सायंकाळी चार वाजता त्यांना उपोषणस्थळी चक्कर आली. त्यांना सर्वांनी घरी पाठवले. रात्री आठ वाजता त्यांचा मृत्यू झाला. आर्थिक विवंचनेमुळे कामगार तणावाखाली आहेत. जगधने यांच्या मृत्युमुळे कामगार संतप्त आहेत. 
- अर्जुन दुशिंग, उपाध्यक्ष, तनपुरे कामगार कृती समिती 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

Women’s Asian Champions Trophy: भारतीय महिलांचे वर्चस्व कायम; चीनवर ३-० मात करत ग्रुपमध्ये अव्वल

Paranda Assembly Election : मतदानाच्या दिवशी कोणीही 'चप्पल' घालून प्रवेश केल्यास कारवाईची मागणी; अपक्ष उमेदवाराची अनोखी तक्रार

SCROLL FOR NEXT