पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात पावसामुळे दयनीय अवस्था; जनजीवन विस्कळीत

सतीश जाधव

गेल्या पंधरा दिवसापासून एपीएमसी भाजी मार्केटचे सीपीएड मैदान व ऑटोनगर येथील आरटीओ मैदान या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. पावसामुळे व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.

बेळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे (Agricultural Produce Market Committee) (एपीएमसी) सुरू करण्यात आलेल्या शहरातील दोन भाजी मार्केटची (vegetable market) पावसामुळे दयनीय (The rains have damaged) अवस्था झाली आहे. तसेच रात्रीच्या वेळी सामान चोरी होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. बाजार संपल्यानंतर कचऱ्याची उचलही वेळेवर होत नसल्याने याठिकाणी दुर्गंधी पसरत आहे. यामुळे व्यापारातून नाराजी व्यक्त केली जात आहे. कचऱ्याची वेळेवर उचल केली जावी, तसेच या ठिकाणी नेहमी सुरक्षारक्षक नेमावा अशी मागणी केली जात आहे. (The rains have damaged the vegetable market in belgaum)

गेल्या पंधरा दिवसापासून एपीएमसी भाजी मार्केटचे सीपीएड मैदान व ऑटोनगर येथील आरटीओ मैदान या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. पावसामुळे व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. गाळ्यासमोरच अर्धा फूट पाणी तुंबले आहे, यामुळे व्यापार कसा करावा असे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. रोज पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत व्यापार केला जातो. त्यानंतर कचऱ्याची उचल होणे अपेक्षित आहे. मात्र कचऱ्याची वेळेवर चालू होत नाही याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी व्यापारातून केली जात आहे.

दोन्ही मार्केटमध्ये सुरक्षारक्षक नाही. पथदीप ची व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच गाळ्यांना दरवाजे नसल्याने रात्रीच्या वेळी माल चोरी जाण्याच्या घटनात वाढ होत आहे. यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी अशी मागणीही व्यापारातून जोर धरू लागली आहे. एपीएमसीत गोवासह विविध राज्यातील व्यापारी येतात. तसेच बेळगाव तालुक्यासह खानापूर व अन्य तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी आपला सामान आणतात. त्यामुळे भाजी मार्केटमध्ये रोज सामाजिक अंतराचा फज्जा दिसून येत आहे. याकडे एपीएमसी नाही कानाडोळा केला आहे. यामुळे कोरोना वाढण्याची भीतीही निर्माण झाली आहे. (The rains have damaged the vegetable market in belgaum)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT