पाऊस सुरू असल्याने कोयनेतून आज दुपारपर्यंत ५० हजार क्युसेस विसर्ग सोडण्यात येणार आहे.
सांगली : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरूच असून आज सकाळीच कृष्णाने सांगलीत धोक्याची पातळी गाठली. आयर्विन पुलाजवळ नदीची पाणीपातळी ४० फुटांवर गेली असून आणखी दहा ते बारा फूट पाणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाऊस सुरू असल्याने कोयनेतून आज दुपारपर्यंत ५० हजार क्युसेस विसर्ग सोडण्यात येणार आहे.
सांगलीतही गुरुवारी दिवसभर तसेच शुक्रवारी रात्रभर संततधार पाऊस सुरू होता. पाटबंधारे विभागाने आज सकाळी कृष्णा नदीची पातळी आयर्विन पुलाजवळ ३५ फुटापर्यंत जाईल असा इशारा दिला होता, प्रत्यक्षात तब्बल पाच फूट पाणी जास्त वाढले आहे. सांगलीमध्ये आयर्विन पूल येथे पाणीपातळी ५० ते ५२ फुटापर्यंत जाऊ शकते याची नोंद घेऊन सखल भागातील नागरिकांनी, नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे. नदीपात्रात कोणीही जाऊ नये, यासाठी प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.कोयना धरणा
कोयना धरणातून आज दुपारपर्यंत विसर्ग ५० हजार क्युसेक्स पर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे कृष्णा नदीतील पाणी पातळी सध्याच्या पाणीपातळी पेक्षा दहा ते बारा फुटाने अधिक वाढू शकते. नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक तेथे तात्काळ स्थलांतरण सुरू करावे, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिला आहे.
कृष्णा नदीची पाणीपातळी वाढू लागताच महापालिकेनेही पूरग्रस्त भागातील नागरिकांना स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. तीस फुटांपासून पाणी वाढू लागल्यानंतर आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठावरील मगरमच्छ कॉलनी सूर्यवंशी प्लॉट इनामदार रोड दत्तनगर काका नगर या भागात कृष्णेचे पाणी पसरले आहे त्यामुळे तेथील नागरिकांना तातडीने स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
कृष्णा नदीची पातळी ४० फुटांवर पोहोचल्यानंतर मगरमच्छ कॉलनी पर्यंतचा परिसर पाण्याखाली जातो. त्यापाठोपाठ ४५ फुटांपर्यंत सिद्धार्थ नगर, भारत नगर, पाटणे प्लॉट, हरिपूर रोड या परिसरात पाणी येते. तर त्यापुढे मारुती चौकातून पाणी यायला सुरुवात होते. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी तातडीने पूर स्थिती लक्षात घेऊन सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
नदीची पातळी ४८ फुटांपर्यंत गेल्यास सांगलीतील व्यंकटेश नगर, अमराई, रामनगर, टिळक चौक, कोल्हापूर रोड, बापट बाल, मंगेश चौक, सांगली वाडी, शामराव नगर, खीलारे प्लॉट, लठ्ठे सोसायटी परिसर पाण्याखाली जातो. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग ५० हजार क्यूसेक्स पर्यंत गेल्यास या परिसरात पुराचे पाणी येण्याचा धोका आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.