शेवगाव : ""आपल्या कृषिप्रधान देशात नवनवे सुशिक्षित गुलाम तयार करणारे शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे आपल्या शिकण्याची आणि शिकवण्याची प्रेरणाच हरवलेली दिसते. दिशाहीन शिक्षणामुळे आगामी काळात सुशिक्षितांच्या आत्महत्या पाहण्याचे दुर्भाग्य आपल्या वाट्याला येऊ शकते,'' अशी खंत ज्येष्ठ कवी नारायण सुमंत यांनी व्यक्त केली.
हेही वाचा खबऱ्यामुळे सापडला विकृत आरोपी
शेवगाव येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टतर्फे आयोजित (स्व.) बाळासाहेब विखे पाटील स्मृती व्याख्यानमालेत चौथे पुष्प गुंफताना "वारी ते बारी' या विषयावर ते बोलत होते. शेवगाव शैक्षणिक संकुलाचे कार्यकारी संचालक डॉ. युवराज नरवडे, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत शिंदे, प्राचार्य डॉ. ओंकार रसाळ, बबन भुसारी, अंबादास कळमकर, बापूसाहेब भोसले, शिवाजी देवढे, सुधीर कंठाळी आदी उपस्थित होते.
येथे क्लिक करा नगररचना पुनर्रचनेसाठी आयुक्तांना अहवाल
सुमंत म्हणाले, ""दुसऱ्याचे उद्योगधंदे चालविण्यासाठी आपण शिकू नये. ज्ञान कधीही अर्थार्जनासाठी घेतले जात नाही. नोकरी हा जगण्याचा मार्ग नाही. महत्प्रयासाने मिळालेले ज्ञान आजकाल दुसऱ्यांना पैसे कमावून देण्यासाठी वापरले जात आहे. पालकांच्या अपेक्षांचा मार्क्सवाद विद्यार्थ्यांसाठी जीवघेणा बनला आहे. मुलांचे बालपण, तारुण्य हिरावून आपण त्यांच्यातील उदयोन्मुख चित्रकार, कलाकार, खेळाडू, उद्योजक मारून टाकत आहोत. संतांपासून शाहिरांपर्यंतच्या विविध सांस्कृतिक प्रवाहांनी समृद्ध झालेल्या महाराष्ट्राला या सर्वांची गरज आहे. फक्त कर्मचारी तयार करून आपण आपले मेंदू पगारी तत्त्वाने भाड्याने देत आहोत.''
या वेळी सुमंत यांनी विविध कविता सादर केल्या. प्रा. मोहन परतवाड यांनी प्रास्ताविक केले. प्रा. रामदास कातकडे यांनी सूत्रसंचालन केले. हमीद शेख यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.