child death After Vaccination sakal
पश्चिम महाराष्ट्र

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रामदुर्ग तालुक्यातील तीन बालकांचा मृत्यू

आरोग्य विभागाने केलेल्या प्राथमिक चौकशीत लसीची कोल्ड चेन सुटल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती उघडकीस आली आहे

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांच्या(health department staff) हलगर्जीपणामुळे रामदुर्ग तालुक्यातील तीन बालकांचा लसीकरणानंतर मृत्यू (Three children die after vaccination) झाला आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री बसवराज बोम्मई(CM Basavaraj Bommai) यांनी गंभीर दखल घेतली असून जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यानी सविस्तर अहवाल मागविला आहे.

सोमवार (ता.१७) यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून संपूर्ण घटनेसंबंधी सविस्तर अहवाल देण्याची सूचना केली आहे. मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्यामध्ये झालेल्या दूरध्वनी संभाषना नंतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे. आरोग्य विभागाने केलेल्या प्राथमिक चौकशीत लसीची कोल्ड चेन सुटल्यामुळे ही घटना घडल्याची माहिती उघडकीस आली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांनीही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अहवाल मागितला आहे. आता मुख्यमंत्र्यांनीही या घटनेसंबंधी जिल्हाधिकार्‍यांकडून अहवाल मागविला आहे. या प्रकरणी आरोग्य खात्यातील आणखी काही जणांवर देखील कारवाईची टांगती तलवार आहे.

नियमित लसीकरणानंतर

रामदुर्ग तालुक्यातील तीन बालकांचा मृत्यू झाल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून राज्यातील बालकांना करण्यात येणारे नियमित लसीकरण सध्या थांबविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT