Electric Shock Incident esakal
पश्चिम महाराष्ट्र

हृदयद्रावक! शेतात वैरण आणायला गेलेल्या पिता-पुत्रासह चुलत्याचा तुटून पडलेल्या वीज वाहिनीच्या धक्क्याने मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

वडिलांना वाचविण्यास गेलेला साईराजचाही जागीच मृत्यू झाला. खरे तर त्यानेच आरडाओरडा करून घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली होती.

म्हैसाळ : मिरज तालुक्यातील म्हैसाळ (Mhaisal Miraj) येथे काल (रविवार) सकाळी शेतात वैरण आणायला गेलेल्या पिता-पुत्रासह चुलत्याचाही तुटून पडलेल्या वीज वाहिनीचा धक्का (Electric Shock) बसून मृत्यू, तर एक जण जखमी झाला. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पारिशनाथ मारुती वनमोरे (वय ४०), साईराज पारिशनाथ वनमोरे (वय १२) हे पित्रा-पुत्र तर काका प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे (३५, रा. म्हैसाळ) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. हेमंत पारिशनाथ वनमोरे (१५) हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वनमोरे कुटुंबीयांनी महावितरणच्या कारभारामुळे ही घटना घडली असून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेने म्हैसाळ गावावर शोककळा पसरली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, म्हैसाळ येथील सुतारकी माळ परिसरात वनमोरे कुटुंबीयांची शेती आहे. नेहमीप्रमाणे शेतात वैरण काढण्यासाठी पारसनाथ वनमोरे मुलासह गेले होते. दरम्यान, शेतात तुटून पडलेल्या वीज वाहिनीचा वनमोरे यांना जोराचा धक्का बसला. त्यांच्या सोबत असलेल्या हेमंतलादेखील विजेचा धक्का लागताच तो फेकला गेला. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मागून येणाऱ्या साईराजने घरी पळत जाऊन कुटुंबीयांना ही माहिती सांगितली.

त्यानंतर चुलते प्रदीप यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र वीज वाहिनी तुटून पडलेल्या परिसरात पाणी साचले होते. त्यात विजेचा प्रवाह उतरला होता. त्या पाण्यात प्रदीप यांनाही विजेचा धक्का बसला. त्यातच त्यांचाही मृत्यू झाला. दरम्यान साईराजने परत शेतात येऊन वडिलांना उठविण्याचा प्रयत्न करताच साईराजलाही विजेचा धक्का बसून त्याचाही जागेवरच मृत्यू झाला. घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली.

पालकमंत्र्यांकडून विचारपूस

पालकमंत्री सुरेश खाडे यांनी तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. घटनेचे गांभीर्य ओळखून अधिकाऱ्यांना सखोल चौकशीचे आदेश दिले. महावितरणच्या निष्काळजीमुळे अपघात झाल्याची तक्रार म्हैसाळ ग्रामस्थ आणि होनमोरे कुटुंबीयांनी पालकमंत्र्यांकडे केली.

अनेक खांब धोकादायक

महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा फटका यापूर्वी देखील मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. शेतातील वीजवाहिन्या लोंबकळत असून खांब झुकलेले आहेत. असे धोकादायक खांब काढण्याची सद्‍बुद्धी महावितरणच्या अधिकाऱ्यांना आता तरी येईल का, असा सवाल उपस्थित होत आहे.

महावितरणच्या निष्काळजीमुळे वनमोरे कुटुंबीयांतील तिघांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे. तसेच शासनाने पीडित कुटुंबीयांना मदत केली पाहिजे.

-सौ. रश्मी आबासाहेब शिंदे-म्हैसाळकर, सरपंच, म्हैसाळ

हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

वडिलांना वाचविण्यास गेलेला साईराजचाही जागीच मृत्यू झाला. खरे तर त्यानेच आरडाओरडा करून घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली होती. यात मोठ्या भावाला वाचविण्यात तो यशस्वी झाला; परंतु वडील बेशुद्ध पडलेले पाहून त्यांना स्पर्श करताच साईराजला विजेचा धक्का लागताच जागेवरच त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. महावितरणच्या अनागोंदीमुळेच ही दुर्दैवी घटना घडली आहे. महावितरणने पीडित कुटुंबीयांना ठोस आर्थिक मदत जाहीर केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही.

-सुनील भरत कांबळे, मृतांचे नातेवाईक, म्हैसाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: कुणबी दाखले मिळवतानाच्या अडचणी आता कमी होणार! शिंदे समितीच्या अहवालावर निघणार जीआर

Atal Setu: गाडी थांबवली अन् व्यक्तीची अटल सेतूवरून समुद्रात उडी, वर्षभरातील चौथी घटना

Vidhan Sabha Election 2024: सुमारे 100 जागांसाठी तब्बल 1,688 इच्छुकांचे अर्ज; काँग्रेसचा भाव वधारला

गाईला राज्यमातेचा दर्जा देण्याच्या सरकारचा निर्णय, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले...

Dharavi: विरोध, गोंधळ अन् कारवाई; अखेर धारावीतील 'त्या' मशिदीचा वादग्रस्त भाग समितीच्या लोकांनी पाडला

SCROLL FOR NEXT