निपाणी : पावसाच्या लहरीपणाचा परिसरातील तंबाखू उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निपाणी परिसरातील उत्पादकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे तो धास्तावला आहे. गेल्या आठ दिवसापासून अधून-मधून पडणाऱ्या पावसाने व निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणाने उत्पादक हवालदिल झाला आहे.
मंगळवारी रात्रभर झालेला पाऊस आणि आज दुपारी कोसळलेल्या सरींमुळे चिंता वाढली आहे. पावसाच्या पूर्ण उघडिपीची तंबाखू उत्पादकाला प्रतीक्षा आहे.
लज्जतदार कडकपणा आणि मिठास स्वादासाठी प्रसिद्ध असलेल्या परिसरातील पारंपारिक तंबाखू उत्पादनाचे क्षेत्र सध्या कमालीचे घटले आहे. एकेकाळी किमान तीस हजार हेक्टर क्षेत्रात होणारे हे नगदी उत्पादन कमालीचे घटत जाऊन यंदा रयत संपर्क केंद्राच्या अंदाजानुसार केवळ साडेचार हजार हेक्टर क्षेत्रातच आहे. त्यात पुन्हा दराबाबत भ्रमनिरास होत असताना पावसाने दाणादाण उडवायला प्रारंभ केला आहे. त्यामुळे उत्पादकांची चिंता वाढली आहे.ऑगस्टच्या
ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यानंतर सप्टेंबरच्या मध्यापर्यंत आणि सोयाबीन काढणीनंतर दुबार उत्पादन म्हणून काहींनी लावण केली आहे. अनुकूल वातावरणामुळे लावण चांगली रुजली. औषध फवारणी आणि आंतरमशागतीची कामे सुरू असतानाच पावसाने फेर धरला आहे. गेल्या आठ दिवसातील ढगाळ वातावरण आणि अधून-मधून पडणाऱ्या पावसामुळे चिंता वाढली आहे. ज्या क्षेत्रात तंबाखूला पाणी दिले होते, अशा क्षेत्रातील उत्पादक अधिकच धास्तावले आहेत. ढगाळ दमट आणि रिमझिम पावसाचे वातावरण तंबाखूला अनुकूल ठरते. मात्र सध्याचे वातावरण घातक ठरणारे आहे.
यंदा क्षेत्र कमी असले तरी तंबाखूच्या लावणी चांगल्या रुजलेल्या आहेत. मात्र सध्याचे वातावरण या उत्पादनाला घातक ठरणारे आहे. पाणी दिलेल्या क्षेत्रात सलग चार दिवस पाऊस झाला तर मारक ठरतो. त्यामुळे भीती आहे.
-डी. बी. खोत,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.