The trend of trying out physical fitness among youngsters in the valley of the Sahyadri valley kolhapur marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

गडभ्रमंतीतून फिजिकल फिटनेसचा असा हा ट्रेंड...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यातील गडभ्रमंतीतून युवक-युवतींत फिजिकल फिटनेस आजमावण्याचा ट्रेंड जोरात आहे. राज्यातील गडकोटांच्या मोहिमांसाठी ते रवाना होत आहेत. गडकोटांचा इतिहास जाणून घेण्यासह त्यांच्या संवर्धनाचा संदेश देणे हा मोहिमांचा उद्देश आहे. जिल्ह्यातील विविध गडकोटप्रेमी संस्थांतर्फे मोहिमांचे आयोजन केले जाते.  

लहान मुलांपासून वृद्ध नागरिकांचा मोहिमांत समावेश

जिल्ह्यातील पन्हाळा, पावनगड, मुडागड, विशाळगड, भुदरगड, रांगणा, सामानगड, महिपालगड, गंधर्वगड, कलानिधीगड, पारगडावर आठवड्यातून एकदा युवक-युवतींची सैर असते. गडकोट अभ्यासक, इतिहासप्रेमी, संशोधक गडकोटांचा इतिहास जाणून घेण्यासाठी गडावर फेरफटका मारतात. दिवाळीनंतर गडकोट संघटनांना राज्यातील विविध गडकोटांच्या भ्रमंतीचे वेध लागतात. ते यंदाही लागले असून, त्यांच्याकडून भ्रमंतीच्या ठिकाणांकडे पावले वळत आहेत. दहा ते पंधरा जणांच्या गटांसह पन्नास ते साठ मोहीमवीरांच्या तुकड्यांचे नेटके नियोजन केले जात आहे. युवक-युवतींमध्ये फिजिकल फिटनेस आजमावण्याचा ट्रेंड जोरात आहे. त्यामुळे अगदी दहा वर्षांपासून ते साठ-सत्तर वयाच्या मोहीमवीरांना मोहिमेत सामावून घेतले जात आहे. 

पायी प्रवास करण्याकडे कल

दिवसाकाठी सुमारे पंचवीस किलोमीटरचा पायी प्रवास करण्याकडे त्यांचा कल आहे. वर्षातून एकदा लांब पल्ल्याचा पायी प्रवास करण्याची संधी मोहिमांतून ते घेत आहेत. कळसूबाई शिखर चढाई, राजगड-तोरणा-रायगड, नांदगिरी-वर्धनगड-महिमानगड- वारूगड, ताराबाद-मुल्हेर-वाघंबे-साल्हेर-सालोटा, नाणेघाट-हडसर-शिवनेरी-चावंड असे ट्रेक संस्थांतर्फे घेतले जात आहेत. विशेषत: अवघड चढाईच्या गडांवर दोन दिवसांची मोहीम घेऊन गडप्रेमींना गडाची माहिती दिली जात आहे. विशाळगड, पावनखिंड, मानोली देवराई अशा एकदिवसीय मोहिमेतून इतिहाला उजाळा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

‘‘गडकोटांवर प्लास्टिक कचरा कोणी टाकू नये, याचा प्रचार आम्ही करतो. गडकोटांचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी व्यापक चळवळ आकाराला येत आहे. युवक-युवतींचा त्यात सहभाग वाढत आहे.’’
- नितीन देवेकर, गडकोट गिर्यारोहक संस्था

गडभ्रमंतीत सोबत काय असावे..? 

  • सॅक, शूज, टॉर्च, टेंट, अंथरूणासह पाण्याच्या दोन बाटल्या आवश्‍यक.सुका मेवा, आगपेटी, सुई-दोरा, वही-पेन हवे.
  • प्रथमोपचार पेटी सोबत असावी.
  • टीममध्ये एखादा डॉक्‍टर असावा.

काळजी काय घ्याल..? 

  • मधमाश्‍यांच्या पोळ्यांना धक्का नको.
  • गडावरील वास्तूवर नावे लिहू नका.
  • सरपटणाऱ्या प्राण्यांपासून सावध राहा.
  • धोकादायक तटबंदीवर जाणे टाळा.
  • गडावरील टाक्‍यांतील पाणी उकळून प्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

त्याने कधीही माझ्यावर शंका... मृणाल दुसानिसने पतीच्या त्या गोष्टीचं केलं कौतुक, म्हणाली- माझ्याबद्दल पझेसिव्ह असणं

Latest Marathi News Updates live : पुण्यात मित्र पक्षाला एकत्र घेत महायुतीची रणनीती ठरली

Swiggy IPO: स्विगीचा 11,327 कोटी रुपयांचा IPO उघडला; गुंतवणूक करावी का? काय आहे तज्ज्ञांचे मत?

IPL Mega Auction 2025: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर यांच्यासह २३ भारतीय खेळाडू २ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये; कोणाला हाय डिमांड?

SCROLL FOR NEXT