Valmiki temple Marihal Police esakal
पश्चिम महाराष्ट्र

Valmiki Temple : वाल्मिकी मंदिराजवळ विजेच्या धक्क्याने दोन महिलांचा दुर्दैवी अंत; मंदिराचे गेट लावताना दुर्घटना

सकाळ डिजिटल टीम

सुळेभावीला वाल्‍मीकी मंदिर आहे. मंदिर प्रवेशासाठी मुख्य गेट आहे. गेटच्या बाजूला विजेची वायर गेली आहे. त्याचा स्पर्श गेटला झाल्याने विजेचा धक्का बसला.

बेळगाव : विजेच्या धक्क्यात दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना सुळेभावीत काल (ता. ५) घडली. सविता फकिराप्पा वंटी (वय ३६) आणि कलावती मारुती बिदरवाडी (वय ३७, रा. दोघे रा. सुळेभावी, ता. बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले, सुळेभावीत वाल्‍मीकी मंदिर (Valmiki Temple) आहे. याठिकाणी काल दुपारी चार वाजता धर्मस्थळ संघाची बैठक होती. बैठकीला गावातील २५ पेक्षा अधिक महिला आल्या होत्या. नियोजनाप्रमाणे मंदिरामध्ये बैठक पार पडली. बैठकीनंतर आलेल्या महिला येथून निघून गेल्या. त्यानंतर काही जणांनी मिळून मंदिर पाण्याने स्वच्छ केले.

त्यानंतर मंदिराच्या खिडक्या आणि दरवाजा बंद करून गेट लावण्याचा प्रयत्न करताना विजेचा धक्का बसला. यात जागेवर सविता वंटी यांचा मृत्यू झाला. तर कलावती बिरदवाडी अत्यवस्थ होत्या. यामुळे बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे दोन्ही महिलांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला. मारीहाळ पोलिसांनी (Marihal Police) घटनास्थळी धाव घेतली. मारीहाळ पोलिस ठाण्यात याची नोंद आहे.

नेमकी घटना अशी घडली

सुळेभावीला वाल्‍मीकी मंदिर आहे. मंदिर प्रवेशासाठी मुख्य गेट आहे. गेटच्या बाजूला विजेची वायर गेली आहे. त्याचा स्पर्श गेटला झाल्याने विजेचा धक्का बसला. मंदिरातील संघाची बैठक, स्वच्छता झाल्यानंतर सविता यांनी गेट बंद करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गेटचा स्पर्श विद्युत वाहिनीला झाला. यातून सविता यांना विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. सविता अत्यवस्थ का झाल्या, हे पाहण्यासाठी जेव्हा कलावती आल्या आणि त्यांनीही स्पर्श केल्यामुळे विजेचा धक्का बसला.

यामुळे सविता आणि त्यानंतर कलावती यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कालपासून श्रावण सोमवार सुरू झाला आहे. यामुळे सुळेभावीतील लक्ष्मी देवीला मोठ्या स्वरूपामध्ये भाविक आले होते. जेव्हा विजेच्या धक्क्याने महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती कळाली. तेव्हा ग्रामस्थ आणि भाविकांनी एकच गर्दी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu: 'तिरुपती'च्या लाडूवरुन 'अमूल'चं स्पष्टीकरण; म्हणाले, आमचा पुरवठा...

IND vs BAN: भाई कॅमेरा अपने पे है! विराट-रोहितच्या मस्तीनं चक्क गंभीरलाही खळखळून हसवलं, ड्रेसिंग रुममध्ये Video Viral

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे बँकेत हेलपाटे,साडेअकरा लाख महिला पात्र : तिसऱ्या हप्‍त्याच्या प्रतीक्षेत

HC scraps IT rules: कुणाल कामराचा दणका! हाय कोर्टाने आयटी नियमावलीतील दुरुस्ती केली रद्द, आतापर्यंत काय-काय घडलं?

Latest Marathi News Updates : आरटीओ कर्मचारी संघटनेची परिवहन आयुक्तांशी झालेली चर्चा फीसकटली

SCROLL FOR NEXT