Malekarni Temple Uchgaon esakal
पश्चिम महाराष्ट्र

'या' देवस्थानमध्ये बकऱ्याचा बळी देण्यावर बंदी; ग्रामपंचायतीने घेतला मोठा निर्णय, जर कोणी 'असं' केल्यास फौजदारी गुन्हा होणार दाखल

सकाळ डिजिटल टीम

ओटी भरणे, गाऱ्हाणे घालणे या प्रथा आहेत, त्या नेहमीप्रमाणे सुरू राहतील. देवीच्या दर्शनासाठी कोणालाही बंदी नाही.

बेळगाव : उचगाव येथील मळेकरणी देवस्थानसमोर (Malekarni Temple Uchgaon) आणि मंदिर परिसरामध्ये यापुढे बकऱ्यांचा (Goat) बळी देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कोणालाही देवीच्या नावाने बकऱ्याचा बळी देऊन मांसाहारी जेवणावळी घालता येणार नाहीत. जर कोणी असे केल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी (ता. २७) उचगाव ग्रामपंचायत, देसाई भाऊबंद कमिटी, देवस्की पंच कमिटी आणि ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

बहुमताने हा महत्त्‍वपूर्ण ठरावही मंजूर करण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उचगाव ग्रामपंचायतच्‍या (Uchgaon Gram Panchayat) अध्यक्षा मथुरा तेरसे होत्या. उचगाव येथील गांधी चौकातील मध्यवर्ती गणेश विठ्ठल-रखुमाई मंदिरामध्ये (Ganesh Vitthal-Rakhumai Temple) सोमवारी सकाळी उचगावातील ग्रामस्थ, देसाई भाऊबंद कमिटी, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आजी-माजी अध्यक्ष-उपाध्यक्षांची बैठक बोलावली होती. मळेकरणी आमराईमध्ये मंदिरात येण्यासाठी कोणालाही बंदी नाही.

ओटी भरणे, गाऱ्हाणे घालणे या प्रथा आहेत, त्या नेहमीप्रमाणे सुरू राहतील. देवीच्या दर्शनासाठी कोणालाही बंदी नाही. जर यात्रा करायची असेल तर त्यांनी देवीचा कुंकू, फूल घेऊन बकऱ्याला लावून त्यांनी आपल्या घरी यात्रा करावी. जेवणावळी आपल्याच परिसरात कराव्यात. मात्र, उचगाव अमराईचा परिसरामध्ये ही यात्रा करण्यावर पूर्णपणे बंदी असेल, असा निर्णय झाला. २८ मे रोजीची यात्रा मात्र आधीप्रमाणेच होईल, त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होईल.

Malekarni Temple Uchgaon

मळेकरणी देवस्थानमध्ये वर्षभर मंगळवारी आणि शुक्रवारी बकऱ्याचा बळी देऊन मासांहारी जेवणावळी होतात. यात्रेमध्ये मौजमस्ती, मांसाहारी जेवणावळी, दारू पिणे होते. यात्रेमुळे देवीच्या नावाने बळी दिला जातो. परिसरात बकऱ्यांचे अवशेष, रक्त आणि इतर टाकाऊ पदार्थ टाकले जातात. यात्रेमुळे वाहतुकीची सातत्याने होणारी कोंडी होत होती. जर मंगळवारी, शुक्रवारी ग्रामस्थांना, प्रवाशांना नाहक त्रास होत होता. दारू पिणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली होती. परिसरातील शेतवडीत दारूच्या बाटल्या फेकून देत. बाटल्या फोडून शेतात टाकल्या जात होत्या. कचरा काढणे शेतकऱ्यांना मुश्कील झाले होते.

अवशेषांमुळे कुत्र्यांची संख्या अफाट वाढली आहे. परिसरात मराठी, कन्नड प्राथमिक शाळा आहेत. मुलांच्या आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण झाला होता. जवळच प्राथमिक आरोग्य केंद्र असून, रुग्णांना या दुर्गंधीशी सामना करावा लागत होता. मळेकरणीच्या आमराईतून कोणेवाडी, तुरमुरी येथून ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींच्या तसेच महिलांच्या विनयभंगाच्या घटना घडत होत्या. याचा विचार करून यात्रा बंद करण्याचा निर्णय सर्वांनुमते घेण्यात आला. या बैठकीमध्ये ग्रामपंचायत उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, पुंडलिकराव कदम-पाटील, युवराज कदम, बी. एस. होनगेकर, बाळासाहेब देसाई, डॉ. प्रवीण देसाई, संभाजी कदम, रामा कदम यांनी मार्गदर्शन केले. एन. ओ. चौगुले यांनी स्वागत केले. आभार एल. डी. चौगुले यांनी मानले.

मळेकरणी देवी यात्रेमध्ये होणारी गर्दी त्याचप्रमाणे देवीला मान देत असलेल्या बकऱ्याचे रक्त व इतर पदार्थ यामुळे गावांमध्ये दुर्गंधी होत आहे. सर्व बाबींचा विचार करून आज गावकऱ्यांनी मळेकरणी देवस्थान कमिटी व ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्ये यापुढे मळेकरणी देवी समोर व मंदीर परिसरामध्ये बकऱ्याचा बळी न देण्याचा निर्णय घेतला आहे. देवीची विधीपूर्वक ओटी भरून अंगारा घेऊन आपल्या घरी जाऊन बकऱ्याला लावणे व बकरे कापणे तसेच यात्रा करणे, असा सर्वानुमते ठराव आजच्या बैठकीत मंजूर झाला आहे.

-मथुरा तेरसे, अध्यक्षा, ग्रामपंचायत उचगाव

मंगल कार्यालयातील यात्रेवरही बंदी

याचबरोबर मंगळवारी, शुक्रवारी उचगाव परिसरातील जी मंगल कार्यालये आहेत, त्याही ठिकाणी कोणालाही यात्रा करता येणार नाही. जर या ठिकाणी यात्रा कोणी केलीच, तर त्यांच्यावरही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा ठराव ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे. बैठकीत ग्रामपंचायतचे विकास अधिकारी (पीडीओ) शिवाजी मडवाळ यांनी यापूर्वी देवस्थान कमिटी आणि ग्रामपंचायत यांच्यामध्ये झालेल्या पत्रव्यवहाराची संपूर्ण माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT