पश्चिम महाराष्ट्र

उदयनराजे भाेसलेंचा जनतेस संदेश

सिद्धार्थ लाटकर

सातारा : साताराचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले सध्या मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपाचारार्थ दाखल आहेत. साताऱ्यासह राज्यातील त्यांचे चाहते त्यांच्या तब्येतीच कार्यकर्त्यांना, समर्थकांना विचारपूस करीत आहेत. मंगळवारी (ता. 18) रात्री उशिरा त्यांचे चूलत बंधू माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील रुग्णालयात भेट देऊन तब्येतीची विचारपूस केली होती. आज (गुरुवार) खूद्द उदयनराजेंनीच ट्विट करत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती जनतेपर्यंत पोहचवली आहे. 

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे मंगळवारी (ता. 18) फलटण येथे गेले होते. तेथून परतल्यानंतर सायंकाळी साताऱ्यातील कमानी हौदानजीक त्यांना असवस्थ वाटू लागले. त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांनी तातडीने तेथील नागरीकांच्या मदतीने खासगी दवाखाना गाठला. तेथे त्यांचे हदयरोग तज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारची रात्र शिवेंद्रसिंहराजेंना रुग्णालयातच ठेवण्यात आले. आमदारांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती एकेक कार्यकर्त्यांपर्यंत पोहचली आणि रुग्णालयाच्या बाहेर तोबा गर्दी झाली होती. शिवेंद्रसिंहराजेंच्या तब्येतीची काळजी प्रत्येकालाच वाटत होती. एखादे वाहन रुग्णालयातून अथवा परिसरात मुख्य रस्त्यावर आले की कार्यकर्ते त्याकडे जात कशी आहे तब्येत महाराजांची अशी चौकशी करताना दिसायचे. शिवेंद्रसिंहराजेंच्या पत्नी वेदांतिकाराजे आणि चूलत बंधू विक्रमसिंहराजे हे राजेंची वैद्यकीय तपासणीपुर्ण होई पर्यंत रुग्णालयातच थांबले होते. सर्व तपासण्या झाल्यानंतर डॉ. साबळे यांनी सर्वांनी निश्‍चिंत रहा असा दिलासा दिला. दरम्यान शिवेंद्रसिंहराजेंची तब्येत बिघडल्याचे आणि त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच ज्येष्ठ नेते शिवाजीराजे भोसले, माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी रुग्णालयात संपर्क साधून त्यांची ख्यालीखूशाली विचारली. रात्री उशिरा उदयनराजे रुग्णालयात आले. काही काळ ते शिवेंद्रसिंहराजेंजवळ थांबले आणि निघून गेले. दूसऱ्या दिवशी बुधवार (ता. 19) सकाळच्या प्रहरी शिवेंद्रसिंहराजेंच्या तपासण्या झाल्या. सर्व काही नॉर्मल असल्याचे त्यांना डॉ. साबळे यांनी सांगितले. त्यानंतर पूढील काही तपासण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे कुटुंबियासमवेत मुंबईला गेले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

वाचा : ठाकरे सरकाराचा भाजपला धक्का; पाणी प्रश्न पेटणार ?

हेही वाचा : शिवेंद्रसिंहराजे सुखरुप; पुढील उपचारार्थ मुंबईला रवाना


आज (गुरुवारी) उदयनराजेंनी ट्विट करुन आमचे बंधू आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती ठणठणीत आहे कार्यकर्ते व समर्थक यांनी काळजी करण्याचे कारण नाही. हॉस्पिटलमधून लवकरच डिस्चार्ज घेऊन ते आपल्या सर्वांच्या समोर येऊन संवाद साधतील असा जनेतला संदेश दिला आहे. यामध्ये त्यांनी गेट वेल सून असा हॅशटॅगही जाेडला आहे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly: आला, आला, आला...पाटील आला! सरकार कुणाचेही असो; रुबाब 'पाटलां'चाच! राज्यातून २४ 'पाटील' पोहोचले विधानसभेत

SMAT 2024-25: कॅप्टन श्रेयस अय्यर-ऋतुराज गायकवाड येणार आमने-सामने; मुंबई-महाराष्ट्र संघात आज लढत

सातारा जिल्ह्यातील नेत्यांच्या मुंबईत गाठीभेटी; महायुतीच्या आमदारांसोबत उदयनराजेंनी घेतली फडणवीस, पवारांची भेट

IND vs AUS 2nd Test: रोहित आला पण... टीम इंडियाचा युवा फलंदाज दुसऱ्या कसोटीला मुकणार, दुखापतीचे ग्रहण

Latest Marathi News Updates: अंधेरी परिसरात इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT