सोलापूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक स्वच्छतागृह उभारणाऱ्या लाभार्थ्यांना आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान या योजनेंतर्गत सोलापूर महापालिकेस 22 हजार 500 चे उद्दीष्ट देण्यात आले होते, त्यापैकी 20 हजार 370 स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
हेही वाचा... सोलापुरात शिवसैनिकाने सुरु केले स्वखर्चाने शिवभोजन
तर शहरांचा समावेश डेंजर झोनमध्ये
शासनाने दिलेल्या मुदतीत हागणदारीमुक्त न होणारी शहरे डेंजर झोनमध्ये समाविष्ट केली जाणार असून, संबंधित महापालिका आयुक्तांच्या गोपनीय अहवालात प्रतिकूल शेऱ्यांची नोंद केली जाणार आहे. मंजूर वैयक्तिक स्वच्छतागृहांची छायाचित्रे केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करायची आहेत. मंजूर स्वच्छतागृहे व त्यांच्या बांधकामाची स्थिती यासंदर्भातील अहवाल तयार करून कृती आराखडा तयार करावा व अंमलबजावणी करावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.
हेही आवर्जून वाचा... आमदार शिंदे म्हणाल्या, प्लीज आता थांबवा आता
तरंगत्या लोकसंख्येसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू आहे. त्याअंतर्गत शहरे हागणदारीमुक्त करणे आणि घनकचरा व्यवस्थापनांतर्गत स्वच्छ करणे या दोन बाबींचा समावेश आहे. राज्यातील शहरातील विशेषतः झोपडपट्टी भागातील नागरिकांना जागेअभावी वैयक्तिक स्वच्छतागृहांची व्यवस्था करणे वघड झाले आहे. ग्रामीण भागातून रोज शहरात मोठ्या संख्येने लोक येतात. शहरात येणाऱ्या या तरंगत्या लोकसंख्येची गरज पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची आवश्यकता आहे.
हेही वाचा... या आहेत फुलांच्या सजावटीतील मास्टर
जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांवर जबाबदारी
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त, मुख्याधिकारी यांच्या मान्यतेने जागा निश्चित करणे, तांत्रिक समितीची मंजुरी घेणे, बांधकामाची निविदा प्रसिद्ध करणे आणि बांधकाम पूर्ण करून ते नागरिकांसाठी खुले करणे, असे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हेही आवर्जून वाचा... कर्मचाऱ्यांवर राहणार सीसीटीव्हीची नजर
आकडे बोलतात..
उद्दीष्ट ः 22 हजार 500
अनुदान ः 15 हजार रुपये प्रती लाभार्थी
बांधकाम पूर्ण ः 20 हजार 370
आधार लिंक पूर्ण ः 10 हजार 512
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.