Vanchit Bahujan Aghadi Chief Prakash Ambedkar  esakal
पश्चिम महाराष्ट्र

Prakash Ambedkar : 'हिटलरने ज्यू लोकांसोबत जे केलं, तेच RSS तुमच्या सोबत करेल'; प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

देशात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास हिटलरशाही सुरू होईल.

सकाळ डिजिटल टीम

लोकसभा निवडणुकीत भाजप आघाडी विरोधातील उमेदवारांपैकी जो भाजपचा पराभव करू शकतो, त्याला मुस्लिमांनी एकत्र मतदान करावे.

मिरज : भाजपने हिटलरशाही सुरू केली आहे. त्यांना राज्यात आणि देशात रोखण्यासाठी कोणत्याही पक्षाच्या सक्षम उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मिरजेत केले. ते मिरासाहेब दर्गा भेटीनंतर मुस्लिम समाजाच्या बैठकीत बोलत होते.

यावेळी युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष इंद्रजित घाटे, जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, नजीर झारी, मेहबूब मणेर उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲड. प्रकाश आंबेडकर सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता मिरजेत त्यांनी मुस्लिम समाजातील धर्मगुरू व नागरिकांची बैठक घेतली.

या वेळी ॲड. आंबेडकर म्हणाले, ‘‘देशात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास हिटलरशाही सुरू होईल. हिटलरने ज्यू लोकांसमवेत जे केले, ते आरएसएस तुमच्या सोबत करेल. त्यांच्या नजरेत सर्व त्यांचे गुलाम आहेत. तशीच त्यांची विचारधारा आहे. तसा व्यवहार त्यांनी आतापासूनच सुरू केला आहे. हे सर्व आपल्याला रोखले पाहिजे. मुस्लिम समाजाने पक्षनिहाय मतदान न करता भाजपविरोधात निवडून येण्यास सक्षम असलेल्या उमेदवारास एकत्र मतदान करावे; मग तो कोणत्याही पक्षाचा असो. लोकसभा निवडणुकीत भाजप आघाडी विरोधातील उमेदवारांपैकी जो भाजपचा पराभव करू शकतो, त्याला मुस्लिमांनी एकत्र मतदान करावे.

पक्ष सोडून पक्षविरहित मतदान करावे; मग तो उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित किंवा कोणत्याही पक्षाचा असो. जो उमेदवार भाजपचा पराभव करू शकतो, त्याच्यासमवेत तुम्ही जा. तो उमेदवार भाजप आणि आरएसएसविरुद्ध लढणारा निवडा. मुस्लिम समाजातील धर्मगुरूंनी नागरिकांना याबाबत जागृत करावे. फेब्रुवारी - मार्चदरम्यान निवडणुका होतील. आणखी तीन महिन्यांचा अवधी आहे. या लोकसभा निवडणुकीत पक्ष नाही, तर मुस्लिम म्हणून मतदान करा, तरच परिस्थिती सुधारेल.’’

‘ईव्हीएमच हटविण्यासाठी जनमत हवे’

ईव्हीएमचा मुद्दा न्यायालयात आहे. ईव्हीएममध्ये उमेदवारांच्या संख्येवर मर्यादा आली आहे. ४३० हून अधिक उमेदवार ईव्हीएममध्ये समाविष्ट होऊ शकत नाहीत. उमेदवारांची संख्या त्याहून अधिक वाढल्यास बॅलेट पेपरशिवाय पर्याय राहणार नाही. शिवाय पेपर ट्रेल मोजणी बंधनकारक करावी. ईव्हीएमच हटविण्यासाठी जनमत तयार करावे लागेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

‘मिरज विधानसभेचा मोर्चा बांधण्याची शक्यता’

मिरजेतील मिरासाहेब दर्गा भेटीदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी युवा प्रदेशाध्यक्ष इंद्रजित घाटे यांच्यासह मुस्लिम समाजाच्या बैठकीत अनेक घडामोडीवर चर्चा झाल्यामुळे ‘वंचित’कडून या जागेवर मोर्चेबांधणी सुरू असल्याचे दिसून आले. यापूर्वी आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचे संकेत दिल्यानंतर मिरज विधानसभेच्या या जागेवर वंचित बहुजन आघाडी दावा करण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT