Prakash Ambedkar vs Sharad Pawar esakal
पश्चिम महाराष्ट्र

OBC नेत्यांचा तो संशय खरा? शरद पवार फक्त मराठ्यांचे नेते यावर शिक्कामोर्तब झालंय, काय म्हणाले आंबेडकर?

सकाळ डिजिटल टीम

''लोकसभेवेळी दलित, मुस्लिमांनी संविधान वाचविण्याचा मुद्यावर ‘इंडिया’ आघाडीला मतदान केले होते.''

सांगली : ‘‘आजवर मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा देण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आतापर्यंत शिताफीने टाळत आले होते. मात्र आता त्यांच्या रत्नागिरीतील वक्तव्याने त्यांचा अंतस्थ हेतू स्पष्ट झाला आहे. तोच संशय ओबीसीचे नेते व्यक्त करीत होते. त्यामुळे आता शरद पवार केवळ मराठ्यांचे नेते आहेत, यावर शिक्कामोर्तब झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी केला.

यावेळी त्यांनी जरांगेंच्या आंदोलनाचे पवार राजकीय बळी ठरल्याचा आरोपही केला.ॲड. आंबेडकर म्हणाले, ‘‘मराठवाड्यात जरांगे विरुद्ध ओबीसी असा उघड संघर्ष सुरू आहे. विधानसभेनंतर मराठ्यांच्या घुसखोरीमुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल, अशी सर्वांची धारणा आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील ओबीसींचा कोटा वाढवून ते मराठ्यांना आरक्षण द्यायला अनुकूल आहेत. आता पवार यांनीही त्यांची री ओढली आहे. त्यामुळे आता जरांगे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते विधानसभा निवडणूक न लढल्यास ते पवारांच्याच इशाऱ्यावर चालतात असे आम्ही समजू.’’

ते म्हणाले, ‘‘लोकसभेवेळी दलित, मुस्लिमांनी संविधान वाचविण्याचा मुद्यावर ‘इंडिया’ आघाडीला मतदान केले होते. आरक्षण हा घटनेतील महत्त्वाचा मुद्दा आहे. हिंदू तत्वज्ञानानुसार तो संविधानाचा आत्मा आहे. तो काढून घेण्याचे काम ‘इंडिया’ आघाडी करीत आहे. त्यामुळे विधानसभेवेळी निवडणुकीत हा समाज मविआच्या बाजूने उभा राहणार नाही.’’

ॲड. आंबेडकर म्हणाले

  • आमदार बच्चू कडू, वामनराव चटप यांच्यासोबत जाणार नाही, असे राजू शेट्टींना कळविले

  • शेट्टींच्या तिसऱ्या आघाडीचे अस्तित्व पश्चिम महाराष्ट्रापुरते मर्यादित असेल तरच त्यांच्याशी समझोता

  • जरांगे यांनी लवचिकपणा सोडल्याने त्यांच्या मागणीला पाठिंबा देणार नाही

  • शासनाने दिलेली ५५ लाख कुणबी प्रमाणपत्रे तातडीने रद्द करावीत

  • धनगर समाजाच्या आरक्षणाचा घात त्या समाजातील अतिविद्वानांकडूनच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: ज्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला, त्यांनाच उपमुख्यमंत्री केलं; अजित पवारांचा उल्लेख करत केजरीवालांची मोदींवर टीका

Latest Maharashtra News Live Updates : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन एक्सप्रेसचा शुभारंभ, 800 लाभार्थी अयोध्येला

अब मजा आयेगा ना भिडू! निक्की तांबोळीची बँड वाजवायला घरात आली राखी सावंत; नेटकरी म्हणाले- चला आता...

Coldplay Concert: 'बुक माय शो'च्या सीईओला अटक होणार? कोल्डप्ले कॉन्सर्टचे प्रकरण पडणार महागात

बन्ना शेख बनली रिया बर्डे...'त्या' बांगलादेशी पॉर्न स्टारबद्दल धक्कादायक खुलासा; राज कुंद्राशीही आहे कनेक्शन

SCROLL FOR NEXT