पलूस : मुसळधार पावसामुळ सांगली शहरासह (sangli flood) जिल्ह्यातील काही भागात लोकांचे नुकसान झाले आहे. आज पलूस तालुक्यातील कृष्णा नदीकाठच्या पूरग्रस्त भागाची राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay vattedivar) यांनी पहाणी केली. कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम (vishwajeet kadam) यांनी त्यांना नुकसानी संदर्भात माहिती दिली. मंत्री वड्डेटिवार हे आज सकाळी पलूस तालुक्यात दाखल झाले. राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम व प्रशासनाकडून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर ते पूरबाधित बुर्ली गावांकडे रवाना झाले. बुर्ली गांवच्या पूरपरिस्थितीची माहिती घेतली.
या पूरग्रस्त शेतकरी व नागरिकांबरोबर त्यांनी चर्चा केली. त्यानंतर मंत्री वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांना स्थलांतरित केलेल्या रामानंदनगर येथील पूरग्रस्तांची भेट घेतली. तेथेही पूरग्रस्तांनी आपल्या समस्या मांडल्या. (sangli flood update) नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली. महापूरचे संकट दुर्दैवी आहे. शेती, घरे, संसार उपयोगी साहित्य, जनावरांचे गोठे असे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासन पूरग्रस्तांचे पाठीमागे ठामपणे उभे आहे. योग्य ती मदत पूरग्रस्तांना केली जाईल, असे आश्वासन यावेळी वडेट्टीवार यांनी यावेळी दिले.
दरम्यान मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी महापूराबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार निवास ढाणे व सर्व विभागाचे अधिकारी, पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.