Virgil found at the gate of the rande 
पश्चिम महाराष्ट्र

रांधेच्या वेशीवर सापडलेली वीरगळ

सकाळ वृत्तसेवा

टाकळी ढोकेश्वर (नगर) ः रांधे (ता. पारनेर) येथे 
गावाच्या जुन्या वेशीच्या पायाच्या खोदकामावेळी पाच फूट खोलीवर एक लांबलचक शिलालेख आढळून आला आहे. वैशिष्ट्यपूर्ण असल्याने त्याबाबत कुतूहल आहे. इतिहास तज्ज्ञांच्या मते, ही वीरगळ आहे. ही वीरगळ इतिहास अभ्यासकांसाठी पर्वणी आहे. त्याद्वारे रांधे गावाचा इतिहास प्रकाशात येऊ शकतो. तेथील उत्खननानंतर इतिहासाचा पैलू समोर येईल. 

गावात असलेली जुनी व भग्नावस्थेतील वेस पाडून नवीन वेस उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जुन्या वेशीच्या खोदकामप्रसंगी ही वीरगळ सापडल्याने, ती कुतूहलाचा विषय बनली आहे. विलास आवारी यांनी याची माहिती पुणे येथील इतिहासाचे अभ्यासक, मोडी लिपी तज्ज्ञ महेश जोशी यांना सांगितली. त्यांनी हा शिलालेख म्हणजे एक वीरगळ असल्याचे सांगितले. तसेच, या संदर्भातील इतिहास ग्रामस्थांपुढे विशद केला. 


जोशी यांनी सांगितले, की वीरगळ साधारणपणे अडीच किंवा तीन फूट दगडावर, एकावर एक या पद्धतीने तीन किंवा चार चौकोन खोदून (कोरून) घेतले जातात. वीरगळचे सामान्यपणे तीन किंवा पाच भाग असतात. खालच्या भागात वीर युद्धात लढत आहेत, असे दाखविलेले असते. यातून लढाईचे कारणसुद्धा स्पष्ट होते. (उदाहरणार्थ गायीसाठी लढाई, घोड्यासाठी लढाई आदी.) मधल्या भागात वीर देवदूत किंवा अप्सरांबरोबर स्वर्गात जात असल्याचे, म्हणजेच वीरगतीनंतरचा प्रवास त्यात दाखविलेला असतो. युद्धात मरण आल्यास स्वर्गलोकप्राप्ती होते, असे यातून सुचवायचे असावे. काही वीरगळ चंद्र, सूर्य यात अंकित असतात. आकाशात चंद्र-सूर्य तळपत आहेत तोपर्यंत या वीरांची स्मृती कायम राहील, असे यातून सूचित करायचे असावे, अशी नोंद इतिहासात वीरगळसंदर्भात आहे. 

वीरगळ परंपरा कर्नाटकातून आली 

वीरगळ परंपरा कर्नाटकातून महाराष्ट्रात आली, असे मानले जाते. कर्नाटकात मोठमोठ्या वीरगळ आढळून येतात. यातील काही वीरगळ शिलालेखयुक्त आहेत. महाराष्ट्रात कोरलेल्या वीरगळ तुलनेने कमी आहेत. कानडी भाषेत कल्लू म्हणजे दगड. वीरकल्लू म्हणजे वीरांचा दगड. त्यावरून महाराष्ट्रात वीरगळ असा शब्द प्रचलित झाला असावा. 
- महेश जोशी, इतिहास अभ्यासक 

माहितीचा फलक लावणार 

जुन्या वेशीच्या खोदकामात जो शिलालेख सापडला आहे, त्या वीरगळ नामक शिलालेखाचे जतन आम्ही करणार आहोत. हा एक ऐतिहासिक ठेवा आहे. त्या संदर्भातील माहितीही आम्ही फलकाद्वारे पर्यटकांना उपलब्ध करून देणार आहोत. 
- संतोष काटे, उपसरपंच, रांधे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Latest Maharashtra News Updates : पाशा पटेल यांच्या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेसची टीका

SCROLL FOR NEXT